Trending Snake Bath Video: 'किंग कोब्रा' (King cobra) हे नाव फक्त ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर शहारे येतात. किंग कोब्रा या सापाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती चक्क किंब कोब्रा या सापाला आंघोळ घालत आहे. 'किंग कोब्रा आणि माणसामधील बाँडिंग पाहा' असं कॅप्शन या व्हायरल व्हिडीओला देण्यात आलं आहे. 


किंग कोब्रा आणि एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती हा किंग कोब्रा या सापाला शॅम्पू लावताना दिसत आहे. शाँम्पू लावल्यानंतर हा व्यक्ती त्या किंग कोब्रा सापाची मालिश करतो. मालिश केल्यानंतर तो व्यक्ती पाण्यानं किंग कोबरा सापाला आंघोळ घालतो.


डी प्रशांत नायर नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवरुन  हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'साप आणि माणूस यांच्यातील बाँडिंग पाहा. व्हिडीओमध्ये ऐकू येणारे मल्याळम गाणे हे एका चित्रपटामधील गाणे आहे. या चित्रपटातील गाण्यात वडील आपल्या मुलाला आंघोळ घालतात, असं दाखवण्यात आलं आहे.' हा व्हिडीओ आठ हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ: 






व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 


व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहे. अनेकांनी व्हिडीओला कमेंट करुन व्हिडीओमध्ये किंग कोब्राला आंघोळ घालणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, 'हे अविश्वसनीय आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'प्राणी आणि माणूस यांच्यामधील हे सुंदर बाँडिंग या व्हिडीओमधून दिसत आहे.' या व्हिडीओला 13 नेटकऱ्यांनी रिट्वीट केलं असून 92 पेक्षा जास्त युझर्सनं या व्हायरल व्हिडीओला लाइक केलं आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Viral Video : तीन कोब्रांबरोबर एकत्र स्टंट करणं पडलं चांगलंच महागात, पुढे काय झालं... तुम्हीच पाहा हा व्हिडीओ