Vimal Maggie Video : सध्या अनेक जण अन्नपदार्थांवर वेगवेगळे आणि विचित्र प्रयोग करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल व्हायला अगदी काही सेकंद पुरेसे असतात. नेटकरी अशा विचित्र प्रयोगांवर चांगलेच संतापतात. 


सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. फक्त दोन मिनिटांमध्ये बनणारी मॅगी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अलिकडच्या मॅगीवरील वेगवेगळ्या प्रयोगाचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा मॅगीवर नवीन प्रयोग करण्यात आला आहे. सध्या विमल मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एकानं विमल पान मसाला आणि मॅगीचं  विचित्र प्रयोग केला आहे. 






व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणानं चक्क मॅगीमध्ये विमल पान मसाला मिसळून नवीन विमल मॅगी तयार केली आहे. शिवाय ही विमल मॅगी खाण्याचं व्हिडीओही इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. r_bam_tv7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.


 


आईस्क्रिमवरही केला प्रयोग
या तरुणानं फक्त मॅगीवरच नाही तर आईस्क्रिमवरही हा विचित्र प्रयोग केला आहे. कुल्फीसोबत विमल मिसळून त्यानं विमल आईस्क्रिम बनवलं आहे. याआधीही आईस्क्रिमसोबक विचित्र प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामध्ये मिरची आईस्क्रिम आणि गाजर हलवा आईस्क्रिम व्हायरल झालं होतं






 


संबंधित इतर बातम्या