Iraq : लग्न करून संसार थाटायचं स्वप्न अनेकांचे असते. अनेक वेळा एकापेक्षा जास्त लग्न कलेल्या व्यक्तींबद्दल तुम्ही ऐकलं असेल. वय जसं वाढते तसे अनेक लोक पुन्हा लग्न करण्याचा विचार करत नाहित. पण एक व्यक्ती मात्र वयाच्या 103 व्या वर्षी बोहल्यावर चढला आहे. हाजी मुखेलिफ फरहौद अल-मन्सूरी (Hajji Mukheilif Farhoud Al-Mansouri) या व्यक्तीनं 37 वर्षाच्या महिलेसोबत लग्न केलं आहे. 


इराक येथे राहणाऱ्या हाजी मुखेलिफ फरहौद अल-मन्सूरी यांनी नुकतेच तिसरे लग्न केलं आहे. त्यांच्या या विवाह सोहळ्याला त्यांच्या 15 मुलांनी तसेच 100 नातवंडांनी हजेरी लावली.  अल-मन्सूरी हे इराकमधील अल-दिवानियाह या शहरामध्ये राहतात. 1919 मध्ये त्यांचा जन्म झाला. गेल्या आठवड्यात त्यांनी सोमार येथील एका 37 वर्षाच्या महिलेसोबत लग्नगाठ बांधली. दुसरी पत्नी सोडून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


अल-मन्सूरी यांच्या मुलानं म्हणजेच अब्दुल सलाम यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्या आईच्या मृत्यूनंतर 23 वर्षांनी माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. पण त्यांची दुसरी पत्नी या वर्षी घर सोडून तिच्या कुटुंबाकडे गेली. माझ्या वडिलांनी काही महिने तिची वाट पाहिली पण  ती परत आली नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी तिसरी पत्नी शोधण्यास सांगितली जी अधिक मुलांना जन्म देऊ शकेल.'


अब्दुल सलाम यांनी पुढे सांगितलं, 'आम्हाला एक चांगली महिला सापडली तिचा जन्म 1985 मध्ये झाला होता. दोघांचा साखरपुडा झाली आणि मग दोघांनी लग्न केलं. माझ्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नाला त्यांची दोन्ही मुले आणि नातवंडे उपस्थित होते.' अल-मन्सूरी यांच्या मुलगा म्हणजेच अब्दुल सलाम हे 72 वर्षाचे आहेत. त्यांनी नऊ लग्न केली असून त्यांना 16 मुलं आणि 17 मुली  आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ


Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ


Viral : माकडाकडून तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा...