Largest Python Ever Found in US : अमेरिकेतील (America) जैव वैज्ञानिकांना 'जगातील सर्वात मोठा' (Largest python ever) अजगर सापडला आहे. फ्लोरिडामध्ये (Florida) सापडलेला हा बर्मीज पायथन जातीचा अजगर (Burmese python) मादी आहे. या अजगराची लांबी 18 फूट आणि वजन 98 किलो आहे. या मादी अजगराच्या पोटात 122 अंडी आहेत. शास्त्रज्ञांना अजगराच्या पोटात खुराचे अवशेष सापडले आहेत, यावरून या अजगराचं शेवटचं भक्ष्य हरीण असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
मादी अजगराच्या पोटात 122 अंडी
या मादी अजगराची नेक्रोप्सी केल्यानंतर त्याचा पोटात 122 अंडी असल्याचं समोर आलं आहे. कन्सझरर्व्हन्सी संस्थेच्या (Conservancy) शास्त्रज्ञांनुसार एकाच वेळी अजगराच्या पोटात इतकी जास्त अंडी सापडल्याची ही पहिली घटना आहे. या अजगराच्या पोटात 122 अंडी सापडणं हा विक्रम आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या अजगराचं वय सुमारे 20 वर्ष आहे. हा आतापर्यंत सापडलेला जगातील सर्वात मोठा अजगर आहे. या आधी सर्वात मोठा अजगर सापडला होता. हा नर अजगर 16 फूट लांब आणि 63 किलो वजनी होता.
20 मिनिटांचे कठोर परिश्रम
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या विशालकाय अजगराला पकडण्यसाठी शास्त्रज्ञांना 20 मिनिटं कठोर प्रयत्न करावे लागले. शास्त्रज्ञांना अजगराच्या पोटामध्ये हरीणाचे अवशेष सापडले आहेत, यावरून त्यानं हरीणाला भक्ष्य बनवल्याचं स्पष्ट झालं. ॲमी बेनेट विलियम्स (Amy Bennett Williams) यांनी या अजगराचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
आतापर्यंत 1000 अजगर पकडण्यात आले
कन्सझरर्व्हन्सीचे पर्यावरण विज्ञान प्रकल्प व्यवस्थापक इयान बार्टोस्झेक यांनी सांगितलं की, त्यांची संस्था 'पायथन प्रोग्राम ऑफ द कन्सझरर्व्हन्सी ऑफ साउथवेस्ट फ्लोरिडा' अंतर्गत 2013 पासून अजगर शोधण्याचं काम करत आहे. यामध्ये मादी अजगरांना या परिसरातून सुरक्षित स्थळी हलवलं जातं. यामुळे इतर जीवांना जगण्याची संधी मिळू शकेल. दक्षिण पश्चिम फ्लोरिडाच्या परिसरातून आतापर्यंत सुमारे 1000 अजगरांना संरक्षित अधिवासामध्ये हलवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या