Trending News : जगभरात अनेक अशी ठिकाणे आहेत, जेथील रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. एका ठिकाणी जुळी मुले जन्माला येतात, तर एका ठिकाणी कमी उंचीची माणसं जन्माला येतात. पण, तुम्ही अशा ठिकाणाबद्दल ऐकलं आहे का जिथे जन्माला मुली येतात, मात्र वय वाढताच मुलगा होतात. आश्चर्यकारक वाटत असलं तरी ही बाब खरी आहे. एक असं गाव आहे, जिथे महिलांच्या पोटी मुली जन्माला येतात, पण वयात आल्यावर त्या मुलं होतात. वय वाढल्यावर या मुलींच्या शरीरात मुलांप्रमाणे बदल होऊ लागतात. असं होण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न वैज्ञानिकही करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावावर संशोधन सुरू आहे, मात्र लिंग बदलाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. 


12 वर्षी अचानक बदलतं मुलींचं लिंग! 


वयाच्या बारा वर्षानंतर मुली मुलगा व्हायला सुरुवात होते, यामागचं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वैद्यकीय शास्त्रात लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. अनेक जण लिंगबदल शस्त्रक्रिया करतात. पण या गावात मुली आपोआपच मुले होतात. अनेक संशोधकांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे कसे घडते आणि यामागचं नेमकं कारण काय हे कोणालाच समजलेलं नाही. या विचित्र प्रकारामुळे आजूबाजूच्या परिसरात या गावाचा शापित गाव असा उल्लेख केला जातो. 


रहस्यमयी गाव जिथे मुली वयात येताच बनतात मुलगा


उत्तर अमेरिकन देश डोमिनिकन रिपब्लिक देशात ला सॅलिनास (La Salinas Village) नावाचं एक गाव आहे. येथील मुलींचे लिंग एका विशिष्ट वयानंतर बदलते. यानंतर मुलीचं रुपांतर हळूहळू मुलामध्ये होऊ लागते. त्यामुळे येथील लोक गावाला शापित गाव मानतात. हे रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेलं नाही. या गावात अनेक वर्षांपासून संशोधन सुरु आहे. पण, वैज्ञानिकांनाही लिंग बदलाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


वयाच्या 12 व्या वर्षी मुली बनतात मुलं


ला सॅलिनास गावात जन्मलेल्या मुली 12 वर्षाच्या होईपर्यंत मुलगा बनतात. त्यांचे लिंग आपोआप बदलते. पुरुषांप्रमाणे त्यांचा आवाज जड होतो. शरीरभर केस वाढू लागतात. या गावातील लोकांना मुलगी व्हावी अशी इच्छा आहे, पण लिंग बदलामुळे मुली जन्माला आल्यावर निराश होतात. त्यांच्या घरावर शोककळा पसरते. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांचं संशोधन सुरु आहे, मात्र त्यानंतरही कोणताही परिणाम समोर आलेला नाही.


मुलगी झाल्यावर पसरते शोककळा


ला सॅलिनास गावातील अनेक मुली 12 वर्षांच्या होईपर्यंत मुलांमध्ये बदलू लागतात. मुली मुलं होण्याच्या या प्रकारामुळे येथील लोक खूप त्रस्त आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणत्यातरी अदृश्य शक्तीची छाया असल्याचा गावातील अनेकांचा समज आहे. याशिवाय काही वयोवृद्ध लोक गावाला शापित मानतात. अशा मुलांना ‘गुडोचे’ असं म्हटलं जातं. याचं कारणामुळे गावात कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली की, त्या कुटुंबात शोककळा पसरते कारण त्यांची मुलगी मोठी झाल्यावर मुलगा होईल, अशी भीती त्यांना वाटते. या आजारामुळे गावातील मुलींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. 


लिंग बदलामागचं कारण अनुवांशिक रोग?


बहुतांश लोक या गावाला शापित मानतात. मात्र, काही तज्ज्ञ लिंग बदलामागचं कारण अनुवांशिक रोग असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या रोगाचं नाव 'स्यूडोहर्माफ्रोडाइट' असं आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, या अनुवांशिक दोषामुळे मुली म्हणून जन्मलेल्या मुलांचे अवयव हळूहळू पुरुषात बदलू लागतात. म्हणजे शस्त्रक्रिया न करता मुलगी आपोआपच मुलगा बनते. अनेक संशोधक अजूनही याच्या संशोधनात गुंतले आहेत. येत्या काळात अशा घटनांना आळा घालण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.