मुंबई : भारत हा राजे आणि सम्राटांचा देश आहे. भारतातील पराक्रमी राजांच्या अनेक कथा देशविदेशात प्रचलित आहेत. इंग्रजांकडून आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भारतातील एका महाराजाने जगातील सर्वात आलिशान आणि महागडी कार कंपनी रोल्स रॉयसला चांगलाच धडा शिकवला. राजस्थान (Rajasthan) अलवरचे (Alwar) महाराज जयसिंह प्रभाकर (Jai Singh Prabhakar) यांची कथा खूप प्रसिद्ध आहे. महाराज जयसिंह यांनी एकदा लक्झरी कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या नवीन कार खरेदी केल्या आणि त्यांचा वापर कचरा काढण्यासाठी केला होता.
वाचा या भारतीय महाराजाची रंजक कहाणी
महाराज जयसिंह यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पाच आलिशान रोल्स रॉयस कार खरेदी केल्या. त्यांनी या गाड्या खरेदी केल्यानंतर हातही लावला नाही. तर त्यांनी पाचही रोल्स रॉयस गाड्या पालिकेकडे सुपूर्द करून त्याचा वापर उद्यापासून शहरातील कचरा उचलण्यासाठी करावा, असे आदेश दिले.
रोल्स रॉयसच्या शोरूममध्ये राजे जयसिंह यांचा अपमान
एकदा महाराज जयसिंह प्रभाकर 1920 च्या सुमारास लंडनला गेले होते. एके दिवस जयसिंह महाराजांचा पोशाख परिधान न करता सामान्य कपड्यांमध्ये लंडनच्या रस्त्यांवर फिरायला निघाले. इकडे-तिकडे फिरत असताना त्यांना रोल्स रॉयस कारचं शोरूम दिसलं. शोरूमच्या आत पार्क केलेल्या रोल्स रॉयस लक्झरी कार जयसिंह यांनी पाहता क्षणी त्यांच्या मनात भरली, म्हणून कार पाहण्यासाठी ते शोरुमच्या आत गेले. जयसिंह त्या दिवशी सामान्य माणसाच्या वेशात असल्यामुळे शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गरीब समजले आणि बाहेर काढलं.
रोल्स रॉयसकडून अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार
या अपमानाचा बदला घेण्याचं महाराज जयसिंह यांनी ठरवलं. महाराजांनी ही बाब मनाशी पक्की केली आणि रोल्स रॉईस कंपनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते नंतर महाराजांच्या पोशाख परिधान करुन रोल्स रॉयसच्या शोरूममध्ये गेला. यावेळी, महाराज जयसिंह शोरूममध्ये पोहोचण्याआधीच कर्मचाऱ्यांना अलवरचे महाराज कार खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे त्यांनी राजा जयसिंह यांचं मनापासून स्वागत केलं. कोणताही वेळ न घालवता महाराजांनी अनेक रोल्स रॉयस गाड्या खरेदी करण्याचा आदेश दिला. हे पाहून तेथील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले.
रोल्स रॉयसमधून कचरा गोळा करण्याचा आदेश
महत्त्वाचं म्हणजे महाराज जयसिंह यांनी सर्व गाड्या रोख पैसे देऊन खरेदी केल्या. एवढी मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर शोरूममधील सर्व कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला. पण राजा जयसिंह पुढे काय करणार आहेत, याचा त्यांना कल्पनाही नव्हती. आलिशान रोल्स रॉयस कार भारतात पोहोचताच राजा जयसिंह यांनी सर्व गाड्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या. यासोबतच या गाड्यांमधून कचरा उचलण्याचा आदेशही त्यांनी दिला. त्यानंतर या आलिशान गाड्यांना झाडू बांधून शहरातून कचरा काढण्यात आला.
रोल्स रॉयसने पत्र लिहून माफी मागितली
महाराज जयसिंह यांच्या या भूमिकेमुळे रोल्स रॉयस कंपनीची फार बदनामी झाली, लोक त्यांची खिल्ली उडवू लागले. याचा इतका वाईट परिणाम झाला की, रोल्स रॉयस कारच्या विक्रीमध्येही घट झाली. भारत ज्या वाहनातून कचरा वाहून नेला जातो ते वाहन कुणी कसं चालवू शकेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आणि लोकांनी कार खरेदी करणं टाळलं. यानंतर अखेर कंपनीने राजा जयसिंह यांना पत्र लिहून कर्मचाऱ्ंयाच्या वागणुकीबद्दल माफी मागितली आणि कारमधून कचरा उचलणं बंद करण्याची विनंती केली. जयसिंह यांनीही आपला मनाचा मोठेपणा दाखवून कंपनीला माफ केले आणि वाहनातून कचरा गोळा करणं बंद करण्यास सांगितलं.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI