Khaby Lame News : सध्या सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे. इथे तुम्ही कोणतीही पोस्ट टाकली की ती लगेच व्हायरल होते. या ठिकाणी अनेकजण रातोरात सेलिब्रिटी देखील झाले आहेत. खाबी लेम (Khaby Lame) हा देखील त्यातलाच एक आहे. टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केलेल्या कंटेंट क्रिएटरच्या यादीत खाबी लेमचा समावेश आहे. एकेकाळी इटलीमध्ये मशीन कामगार म्हणून काम करत असलेला खाबी लेम आज कोटींच्या घरात पैसे कमावतोय. अलीकडेच खाबीने त्याच्या प्रत्येक पोस्टची कमाई सांगितली आहे. त्याची कमाई इतकी आहे की भारतातील अनेक अभिनेते-क्रिकेटर्सही कमाईच्या बाबतीत त्याच्या मागे उभे आहेत.


जूनमध्ये 22 वर्षीय खाबी टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी व्यक्ती बनली आहे. त्याला टिकटॉकवर 14.95 कोटी लोक फॉलो करतात. फॉर्च्युनला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, प्रत्येक व्हिडीओला व्ह्यूज मिळण्याबरोबरच तो मोठी कमाईही करतो. खाबीला प्रत्येक पोस्टसाठी $750,000 (सुमारे 6 कोटी) मिळतात. अशा प्रकारे त्यांची कमाई 2022 मध्ये 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 80 कोटी रुपये) झाली आहे. खाबीची बहुतेक कमाई ब्रँड डीलमधून येते. विशेष म्हणजे, खाबी त्याच्या व्हिडीओमध्ये काही बोलत नाही, तो फक्त त्याच्या विनोदाने लोकांना हसवतो.


कोण आहे खाबी लेम?


खाबी लेम हे सेनेगलचा स्थलांतरित आहेत. 2001 मध्ये तो आपल्या पालकांसह सेनेगलची राजधानी डकार येथून इटलीतील ट्यूरिन येथे गेला. तो चिवासो, ट्यूरिन येथे राहतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कारखान्यात मशिन कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, महामारीच्या काळात त्याची कंपनी बंद पडली. याच दरम्यान, त्याने टिकटॉकवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. हळूहळू त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि तो टिकटॉकचा स्टार झाला. 


भारतीय स्टार्स किती कमावतात?


विराट कोहली भारतातील प्रत्येक पोस्टमधून सर्वाधिक कमाई करतो. एका पोस्टसाठी त्यांना 5.3 कोटी रुपये मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे, जी प्रत्येक पोस्टसाठी 3.2 कोटी रुपये कमवते. त्याचबरोबर शाहरुख खान प्रत्येक पोस्टसाठी 80 लाख ते एक कोटी रुपये घेतो. आलिया भट्ट देखील प्रत्येक पोस्टसाठी फक्त 1 कोटी रुपये घेते. अशा स्थितीत खाबी लेमची एकाच पोस्टची कमाई इतकी आहे की तो देशातील क्रिकेटर आणि सुपरस्टारलाही मागे टाकताना दिसतोय.   


महत्वाच्या बातम्या :