Israel Palestine War: पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर (Israel) हल्ला केल्यानंतर इस्रायलमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. महिला असोत, लहान मुलं असोत किंवा वयोवृद्ध असोत, हमासचे सैनिक आपल्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांनाच लक्ष्य करू लागले आहेत.


इस्रायल देखील आता पॅलेस्टिनी समर्थक असलेल्या हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. हे युद्ध 7 ऑक्टोबरला सुरू झालं, जेव्हा हमासच्या सैनिकांनी एक-एक करून जमीन, हवाई आणि समुद्रातून 5,000 रॉकेट इस्रायलवर डागण्यास सुरुवात केली.


इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात 1,000 हून अधिक जणांचा मृत्यू


इस्रायल या हल्ल्यासाठी तयार नसताना हमासने अचानक हल्ला चढवला. इस्त्रायली सैनिक या परिस्थितीसाठी तयार नसतानाही ते पॅलेस्टिनी आणि हमासच्या हल्ल्याला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत, त्यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. रॉकेट हल्ल्याने सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 1,000 हून अधिक लोक मारले गेले. तर सुमारे 2,000 हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरात देखील बऱ्याच पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.


बिघडत आहे इस्रायलची परिस्थिती


सध्या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जिथे जिथे शत्रू देशाचे लोक दिसतील तिथे इस्रायली सैनिक त्यांच्यावर हल्ला करत आहेत किंवा त्यांना पळवून नेत आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तेथील सद्यस्थितीची योग्य कल्पना येऊ शकते. यातील काही व्हिडिओ पाहूया...






















हेही वाचा:


VIDEO: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये भीषण 'युद्ध'; सर्वत्र क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले, पाहा खळबळजनक व्हिडीओ