India's Biggest Burger : फास्ट फूड (Fast Food) म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. वडापाव, समोसा, पाणीपुरी बर्गर, फ्रेंच फ्राईज हे सर्व डोळ्यासमोर उभं राहतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्गर (Burger) खायला प्रत्येकाला आवडते. जेव्हा बर्गर खायची इच्छा होते तेव्हा बहुतेकांना मॅकडोनाल्ड किंवा बर्गर किंगचा बर्गर खायला आवडतो. पण एका देशी बर्गरने या सर्वांची सुट्टी केली आहे. तुम्ही नेहमी तळहाताएवढ्या आकाराचे बर्गर पाहिले असतील, पण पंजाबमधील एका शेफने जायंट बर्गर बनवला आहे. हा बर्गर चक्क 30 किलो पेक्षाही जास्त वजनाचा आहे.
30 किलोहून अधिक वजनाचा बर्गर
पण आज आम्ही तुम्हाला पंजाबचा एक असा बर्गर दाखवत आहोत, जो माणसाच्या अंगावर येणार नाही, कारण हा बर्गर हातात धरण्याचा छोटासा बर्गर नसून 30 किलोपेक्षा जास्त वजनाचा बर्गर आहे. हा भारतातील सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा केला जात आहे. हा बर्गर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या 30 किलोच्या बर्गरचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ : पठ्ठ्याने बनवला 30 किलोचा बर्गर
भारतातील सर्वात मोठा बर्गर!
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा हा बर्गर भारतातील सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा करणाऱ्या केला जात आहे. हा व्हिडीओ अमृतसरमधील फूड ब्लॉगर अक्षयने त्याच्या 'a_garnish_bowl_' या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये 30 किलोपेक्षा अधिक वजनाचा एक मोठा बर्गर दिसत आहे. हा बर्गर पंजाबच्या होशियारपूरमधील 'सिक्स 10 बर्गर' रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत 'भारतात सर्वात मोठा बर्गर' असं म्हटलं आहे.
12 किलो बन, 16 किलो भाज्या, 5 ते 6 किलो सॉस
हा बर्गर बनवणाऱ्या शेफने सांगितले की, या बर्गरचे वजन सुमारे 40-45 किलोपर्यत असण्याची शक्यता आहे. हा बर्गर नक्कीच 30 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. हा बर्गर बनवण्यासाठी 12 किलो बन, 16 किलो भाज्या, 5 ते 6 किलो सॉस, एक किलो पनीर आणि ते 6 किलो टिक्की वापरण्यात आल्या आहेत. केवळ पंजाबच नाही तर भारतातील हा सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा हा बर्गर बनवणाऱ्या शेफने केला आहे.