Yograj Singh On Arjun Tendulkar: सध्या भारतीय क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि युवराज सिंहचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांची नावे चर्चेत आहेत. अर्जुन तेंडुलकरने नुकतेच गोव्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने 34 वर्षांपूर्वी रणजी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या वडील सचिनची बरोबरी केली आहे. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात अर्जुन (Arjun Tendulkar) आपल्या भेदक गोलंदाजीने झारखंडच्या फलंदाजांना अडचणीत आणत आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अर्जुनच्या (Arjun Tendulkar) शानदार पदार्पणाचे श्रेय योगराज सिंहला (Yograj Singh)  दिले जात आहे. ज्यांच्या देखरेखीखाली या अर्जुनने काही दिवस सराव केला आहे. 


योगराज सिंह (Yograj Singh) यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, त्यांनी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) अर्जुनला (Arjun Tendulkar) प्रशिक्षण देण्यासाठी काय सल्ला दिला होता. योगराज सिंह म्हणाले की, "मी सचिनला एक गोष्ट सांगितली होती, अर्जुनला (Arjun Tendulkar) त्याच्या आईपासून दूर ठेव. कोणत्याही आईला आपल्या मुलाला दुखापत झालेली किंवा त्याला लागलेलं पाहवत नाही." 


योगराज सिंह (Yograj Singh) पुढे म्हणाले, “मी सचिनला सांगितले की अर्जुनने लक्ष केंद्रित करावंआणि तो जे करत आहे ते करत राहावं, अशी माझी इच्छा आहे. मी सचिनला सांगितले की, तुझा मुलगा प्रतिभावान आहे आणि मुंबईने हे टॅलेंट गमावले आहे. अर्जुन (Arjun Tendulkar) जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होईल. मला सचिनसाठी (Sachin Tendulkar) अर्जुन (Arjun Tendulkar) बनवायचा आहे. तो युवीसारखा निर्भय होईल. अर्जुनला वडिलांच्या छायेतून बाहेर येण्याची गरज होती. मी त्याला सांगितले की, तू आधी अर्जुन आहेस आणि नंतर सचिनचा (Sachin Tendulkar)  मुलगा आहेस."


दरम्यान, योगराज सिंह (Yograj Singh) हे त्यांच्या कठोर प्रशिक्षणासाठी ओळखले जातात. क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान योगराज युवराज सिंहाबाबत (Yuvraj Singh) खूप कडक असायचे. युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) निवृत्तीनंतर, योगराज यांनी कबूल केले की, ते कधीकधी युवराजसोबत खूप कठोर वागायचे. वयाच्या 6 व्या वर्षी युवराज स्केटिंग करायचा आणि टेनिस खेळायचा. पण योगराज यांना ते आवडले नाही. ते युवराजचे स्केट्स आणि टेनिस रॅकेट तोडायचे. युवराज सिंह रडायचा आणि त्याच्या सेक्टर 11 च्या घराला जेल म्हणायचा. योगराज सिंह असेही सांगितले की, तो त्याला ड्रॅगन सिंह म्हणून हाक मारायचा. युवराजच्या वडिलांनी (Yograj Singh) सांगितले की, एक पिता या नात्याने त्याने मला अभिमानाने चालण्याचा अधिकार मिळून दिला आहे.