India Pakistan Match: भारत-पाकिस्तान विश्वचषक (World Cup 2023) सामना सध्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीवर सर्वजण खूश असतानाच स्टेडियममध्ये असलेल्या अनेक गुलाबी पोस्टर्सनेही लोकांचं लक्ष वेधलं आहे. या गुलाबी रंगाशी भारत-पाकिस्तान सामन्याचा संबंध काय? असा प्रश्न सोशल मीडियावर लोक सतत विचारत आहेत. या मागचं खास कारण जाणून घेऊया.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वत्र गुलाबी रंग
एक लाखांहून अधिक लोकांनी खचाखच भरलेलं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या दोन रंगांनी न्हाऊन निघालं आहे. पहिला रंग म्हणजे निळा, जो भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग आहे. दुसरा रंग म्हणजे गुलाबी, जो सर्वत्र दिसत आहे.
आता या गुलाबी रंगाचा या सामन्याशी किंवा विश्वचषकाशी काय संबंध? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, यावेळी ICC ने वर्ल्ड कपच्या लोगोमध्ये गुलाबी रंगाचा वापर केला आहे. त्यामुळेच टीव्हीवर चालणारे पंच, यष्टी आणि धावफलक यांचा रंगही गुलाबी दिसत आहे.
नवरसाचाही विश्वचषकाच्या गुलाबी रंगाशी संबंध
यावेळी आयसीसीने नवरसाच्या थीमवर वर्ल्ड कपचा लोगो बनवला आहे. नवरस हा भारतीय रंगभूमीचा एक भाग आहे. ज्यामध्ये नऊ रंग आहेत आणि प्रत्येक रंग भावना दर्शवतो. या नवरसात गुलाबी रंगाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच यावेळी 2023 च्या विश्वचषकात तुम्हाला सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे.
आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये या गोष्टीचा अधिक चांगल्या पद्धतीने खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला भारतीय संस्कृती आणि सणांशी संबंधित प्रत्येक अँगल पाहायला मिळेल.
किती लोक पाकिस्तानातून भारतात आले?
भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना पाहण्यासाठी पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांची यादी फार मोठी नाही. याचं कारण म्हणजे, भारत सरकार पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला व्हिसा देत नाही. भारताकडून फक्त पाकिस्तानी पत्रकार आणि काही खास चाहत्यांनाच व्हिसा दिला जात आहे.
पाकिस्तानची न्यूज वेबसाईट ट्रिब्युनच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तान उच्चायोग आणि क्रिकेट बोर्डने जवळपास 200 पत्रकार आणि बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना व्हिसा देण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती, पण तरीही सगळ्यांनाच व्हिसा दिला गेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या फक्त 45 पत्रकारांनाच या सामन्यासाठी मान्यता पत्र (accreditation letter) मिळालं आहे.
हेही वाचा:
IND vs PAK: बाबर आझम ते शाहीन... पाकिस्तानच्या खेळाडूंना किती पगार मिळतो?