मुंबई : आपल्या देशात आयएएस आणि आयपीएस ही केंद्रीय सेवा अत्यंत प्रतिष्ठीत मानली जाते. या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना मानसन्मान आणि अनेक सुविधा मिळतात. पण ठराविक काळानंतर या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची आपल्याकडे तरतूद असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू शकतात. वरिष्ठ स्तरावरच्या या बदल्या बऱ्याचदा अधिकाऱ्यांची कामगिरी, त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय गरजांच्या आधारावर केल्या जातात. पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर त्यांना काही सुविधा देण्यात येतात. त्या सुविधा कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात. 


IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. IAS आणि IPS च्या बदल्या नेहमी विभागीय नियम आणि मार्गदर्शक तत्वांनुसार होतात. मात्र नियमानुसार बदलीच्या वेळी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ, त्यांची कामगिरी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये बदल्यांच्या या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती असते. त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या या बदल्यांवर निर्णय घेतला जातो. 


बदलीच्या वेळी अधिकाऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात?


जेव्हा कोणत्याही आयएएस अधिकारी किंवा आयपीएसची बदली केली जाते तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने निवास, वाहन, चालक आणि सुरक्षा दलांचा समावेश आहे.


• आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या ठिकाणी बदली होताना त्या ठिकाणी सर्व साहित्य पोहोचण्यासाठीचा खर्च सरकारकडून केला जातो.
• नवीन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर, अधिकाऱ्याला नवीन बंगला दिला जातो. निवास वाटप प्रक्रियेत विलंब झाल्यास, इतर सरकारी अतिथीगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते.
• IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पूर्वीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी राहण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो.
• याशिवाय, बदलीच्या वेळी अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व भाडेही सरकार देते.
• सरकारी निवासस्थानात लागणाऱ्या सर्व गरजेंच्या वस्तूंसाठीही सरकार पैसे देते.
• बदली झाल्यानंतर नवीन ठिकाणी रुजू होताच अधिकाऱ्यांना गाडी आणि ड्रायव्हरची सुविधा दिली जाते.


IAS IPS Transfer Rules : बदली कधी होते?


राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणत्याही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्याची कधीही बदली करण्यास स्वतंत्र आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या अधिकाऱ्याचे काम चांगले नसेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाऊ शकते. याशिवाय विविध क्षेत्रात कामाचा अनुभव देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या जातात.


ही बातमी वाचा: