How Much Gold In Human Body : मानवी शरीराची (Human Body) रचना फार गुंतागुंतीची आहे. यामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. मानवी शरीरातील अनेक पैलूंचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. याबाबत जगभरातील विविध देशांमध्ये विविध प्रकारची संशोधन सुरु आहेत. मानवी शरीराबद्दल आपल्याला खूप काही जाणून घेण्यासारखे आहे. मानवी शरीराशी संबंधित असे अनेक रंजक तथ्य आहेत जे तुम्हाला माहित नाहीत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
मानवी शरीरात विविध घटक आढळतात. मानवी शरीरात केवळ लोहच नाही तर सोने (Gold) देखील आढळते. हो हे खरं आहे. याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
Gold in Human Body : मानवी शरीरातही आहे सोनं
मानवी शरीरात सोने देखील आढळते, परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मानवी शरीरात सुमारे 0.2 मिलीग्रॅम. सोनं आढळते. हे सोनं शरीरात रक्तात विरघळलेल्या स्वरुपात असते. सोने केवळ मानवी शरीरातच नाही तर गीर गाईच्या मूत्रातही आढळते. त्याचे प्रमाण देखील खूप कमी आहे. मानवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात आढळणार सोनं पार कमी प्रमाणात असल्यामुळे ते वापरता येत नाही.
Most of Gold Reserves are in Sea : सर्वाधिक सोन्याचा साठा समुद्रात
सोने हा मौल्यवान धातूपैकी एक आहे. पृथ्वीवर खाणकाम करून सोने मिळवले जाते. पण फक्त जमिनीवरच नाही तर, समुद्राच्या तळाशीही मोठ्या प्रमाणात सोने आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे सोन्याचा सर्वाधिक साठा समुद्रात आढळतो. समुद्राच्या तळाशी सोन्याचा सर्वात मोठा साठा आठळतो पण हे सोनं समुद्राच्या तळातून बाहेर काढण्यासाठी लागणारा जास्त खर्च आहे. तसेच श्रम आणि वेळ यामुळे समुद्राच्या तळाशी असलेले सोने काढले जात नाही.
मानवी शरीरात लोह किती प्रमाणात आढळते?
मानवी शरीरात विविध घटक आढळतात. शरीरात लोह आणि सोनेही आढळते. मानवी शरीरात आढळणारे सोन्याचे प्रमाण खूप कमी असले तरी शरीरात लोह इतके जास्त प्रमाणात असते. मानवी शरीरात आढळणाऱ्या लोहापासून एक खिळा बनवता येईल, इतके लोहाचे प्रमाण असते.
मानवी शरीर ही एक अशी रचना आहे, ज्याबद्दल अजून खूप माहिती समोर आलेली नाही. यावर शास्त्रज्ञांकडून सतत संशोधन सुरु आहे. येत्या काळात मानवी शरीराशी संबंधित सर्व गुपितेही उघड होण्याची शक्यता आहे.