Health Tips: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ अनेकदा अधिक पाणी (Water) पिण्याची शिफारस करतात. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पण अशातच काहीजण पाणी पिताना त्यात लिंबाचा (Lemon) वापर करतात, लिंबाचा रस पिळलेलं पाणी पिण्यास पसंती दर्शवतात. लिंबू शरिरातील घाण काढण्याचं, शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम जरी करत असलं, तरी यासोबत ते चरबी जाळण्यातचं काम देखील करतं. यामुळे तुमची लठ्ठपणापासून सुटका तर होईलच. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. लिंबू पाण्याचं अतिसेवन शरिरासाठी घातक देखील ठरू शकतं. पण कसं? 


लिंबू पाणी फायदेशीर, तितकंच घातक


लिंबू पाणी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. पण काही लोक घाईत असतात आणि त्यांना सर्व गोष्टींचा परिणाम तात्काळ अनुभवायचा असतो. त्यामुळे काहीजण अति प्रमाणात लिंबू पाणी पितात आणि मग हे शरिरासाठी घातक ठरू शकतं.


नेमकं किती ग्लास लिंबू पाणी पिणं योग्य?


लिंबू पाण्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण जास्त लिंबू पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक असू शकतं. दररोज केवळ एक ग्लास लिंबू पाणी पित असाल तर ते योग्य आहे. परंतु एकपेक्षा जास्त ग्लास लिंबू पाणी पिणं टाळलं पाहिजे.


जास्त लिंबू पाणी प्यायल्यानं होणारं नुकसान


उन्हाळा असो की हिवाळा, पाणी पिताना लिंबाचा वापर करणारे बरेच लोक आहेत. सकाळी उठताच लिंबाचा रस पिळून पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, परंतु दिवसभरात एका ग्लासपेक्षा जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रियाही बिघडू शकते. त्यामुळे लिंबू पाण्याचा वापर नियंत्रित प्रमाणात करा. याच्या मदतीने तुम्ही शरीरात उद्भवणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकता, मात्र जास्त प्रमाणात लिंबू पाणी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.



  • जास्त लिंबू पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

  • लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने पेप्टिक अल्सरचा धोका वाढतो.

  • पाणी पिताना त्यासोबत लिंबू पिळल्यास शरीर डिहाईड्रेट देखील होऊ शकतं.

  • जास्त लिंबी पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकतं.

  • जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात लोहाची (Iron) कमतरता भासू शकते.

  • पचनसंस्थेत अडथळे येऊ शकतात.

  • लिंबू पाणी जास्त प्यायल्याने हाडं कमजोर होतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health Tips: तुम्हालाही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? 'या' आजारांपैकी एक असू शकतं कारण; 'ही' गोष्ट बनवेल सक्रिय