Morning Fatigue: बिझी शेड्युल आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Stressful Lifestyle) सकाळी झोपेतून (Sleep) उठणं कठीण होतं. सकाळी उठताना शरीर खूप जड झाल्यासारखं वाटतं, अंथरुण सोडावंसं वाटत नाही. बर्‍याचदा लोक ही एक सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हालाही सकाळी उठावसं वाटत नसेल तर ही काही आजारांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात, त्याबद्दल जाणून घेऊयात...


सकाळी उठता न येणं 'या' आजारांची लक्षणं



  • मधुमेह (Diabetes)

  • नैराश्य (Depression)

  • कर्करोग (Cancer)

  • मल्टीपल स्क्लेरोसिस

  • चिंता विकार (Anxiety Disorder)

  • किडनी रोग

  • फायब्रोमायल्जिया

  • क्रॉनिक फटीग सिंड्रोम

  • स्लीप एपनिया

  • हायपोथायरॉईडीझम


अशा प्रकारे दूर करा थकवा


क्रॉनिक फटीग सिंड्रोम (Chronic Fatigue Syndrome) किंवा स्लीप एपनियामुळे (Sleep Apnea) तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचं (Raisin Water) पाणी प्यावं. यामुळे शरीरातील कमतरता दूर होऊन ऊर्जा मिळते. हे प्यायल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला सक्रिय (Active) आणि निरोगी (Healthy) वाटू लागेल. मनुक्यांच्या पाण्यात भरपूर नैसर्गिक साखर उपलब्ध असते. रिसर्च गेटच्या मते, मनुका शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देऊ शकते.


स्लीप एपनियामध्ये मनुका फायदेशीर


जर तुम्ही जोरात घोरत असाल तर स्लीप एपनिया होऊ शकतो. यामुळे गाढ झोप येत नाही आणि झोपेच्या कमतरतेमुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि आळस येतो. मनुक्यांमध्ये मेलाटोनिन आढळते, जे गाढ झोपेसाठी आवश्यक आहे. या हार्मोनमुळे त्वचा निरोगी राहते.


लोहाची कमतरता होईल दूर


मनुक्यांच्या पाण्यात भरपूर प्रमाणात लोह (Iron) असतं. शरीराला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी लोह आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे रक्त निर्मिती देखील थांबू शकते आणि सकाळी उठणं देखील कठीण होऊ शकतं, त्यामुळे रोज सकाळी मनुक्यांचं पाणी (Raisin Water) प्यावं.


मनुका पाण्याचे फायदे


मनुक्यांमध्ये फेरुलिक अ‍ॅसिड, रुटिन, क्वेर्सेटिन आणि ट्रान्स-कॅफ्टेरिक अ‍ॅसिड आढळतात. हे सर्व अँटिऑक्सिडंट शरीरात पोहोचून कर्करोग, टाईप 2 मधुमेह आणि अल्झायमरपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे वृद्धापकाळानंतरही शरीर निरोगी राहतं.


मनुक्यांचं पाणी कसं बनवायचं?


मनुक्यांचं पाणी बनवणं खूपच सोपं आहे. 4 ते 5 मनुके एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी प्यायल्यानंतर भिजवलेले मनुकेसुद्धा खाऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्या