Gulab Jamun Name Fact : जगात अनेक जण खाद्यपदार्थांचे शौकीन आहेत. काही खाद्यपदार्थ तर जगभरात प्रसिद्ध आहेत. देशातही अनेक गोड पदार्थ (Sweet) प्रसिद्ध आहे. या मिठाईचं फक्त नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुलाबजाम ही भारतातील फार सुप्रसिद्ध मिठाई आहे. जर तुम्ही गुलाबजामच्या नावाबाबत विचार केला, तर यामध्ये 'गुलाब' आणि 'जाम' असा उल्लेख आढळतो. पण गुलाबजाममध्ये ना 'गुलाब' आहे, ना 'जाम'... मग गुलाबजाम हे नाव कसं पडलं?


तुम्हाला कधी गुलाबजामच्या नावाबाबत प्रश्न पडला आहे का? आता असा प्रश्न पडतो की जर, गुलाबजामचा 'गुलाब' आणि 'जाम' यांच्यासोबत काहीही संबंध नाही मग गुलाबजाम हे नाव आलं तरी कुठून? जाणून घ्या गुलबजाम या नावामागची रंजक गोष्ट...


मुळात गुलाबजाम या शब्दाला 'गुलाब' किंवा 'जाम' याच्यासोबत काहीही संबंध नाही.


Gulab Jamun Interesting Fact : पर्शियाहून भारतात आली गुलाबजाम ही मिठाई


गुलाबजाम ही मिठाई पर्शियातून भारतात आली असे मानले जाते. पर्शियामध्ये गुलाबजामसारखी एक मिठाई फार प्रसिद्ध आहे. या मिठाईचं नाव लुकमत अल-कादी असं आहे. या मिठाईच्या नावामागे इतिहास आहे.


Gulab Jamun Interesting Fact : गुलाबजाम 'हे' नाव कसं पडलं?


गुलाब हा शब्द 'गुल' आणि 'आब' या दोन शब्दांपासून बनला आहे. 'गुल' म्हणजे फूल आणि 'आब' म्हणजे पाणी. याचा अर्थ सुगंध असलेले गोड पाणी. गुलाबजाम बनवण्यासाठी साखरेचा पाक तयार केला जातो आणि हा पाक गोड असतो. त्यामुळे त्याला तेथील लोक गुलाब असं म्हणत. तसेच दुधापासून तयार केलेल्या खव्याचे गोळे तयार करुन ते साखरेच्या पाकामध्ये सोडले जातात. हे गोळे आधी तेलामध्ये तळले जातात, त्यामुळे त्याला गडद रंग येतो. याची तुलना जांभळासोबत करण्यात आली आहे. त्यामुळे या मिठाईला 'गुलाबजाम' हे नाव पडले.


Gulab Jamun Interesting Fact : याबद्दल अनेक कथा प्रचलित


अनेक रंजक कथा प्रसिद्ध सांगितल्या जातात. एका कथेनुसार, गुलाबजाम हा गोड पदार्थ सर्वात आधी इराणमध्ये मध्ययुगात बनवला गेला. त्यानंतर तुर्कस्तानच्या लोकांनी ही मिठाई भारतात आणली. दुसऱ्या एका प्रचलित कथेनुसार, एकदा मुघल सम्राट शाहजहानच्या आचाऱ्याने चुकून गुलाबजाम तयार केले होते. पण, त्यावेळी तो पदार्थ कुणाला जास्त आवडला नाही. पण त्यानंतर हळूहळू लोकांमध्ये त्याची आवड निर्माण झाली आणि भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये गुलाबजाम ही मिठाई प्रसिद्ध झाली.


Gulab Jamun Interesting Fact : गुलाबजामची वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध


लुकमत अल-कादी आणि गुलाबजाम या अरब देशांमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये अनेक साम्य आहेत. पण, हे दोन्ही पदार्थ बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. खानपानाच्या इतिहासाची माहिती असलेले इतिहासकार मायकेल कोंडाल यांनी सांगितले होते की, लुकमत अल-कादी आणि गुलाबजाम या दोन्ही पदार्थांची कल्पना पर्शियन गोड पदार्थांपासूनच झाली आहे. दोन्ही मिठाईंचा संबंध साखरेच्या पाकाशी आहे. दुधाच्या खव्यापासून तयार होणारी ही मिठाई इतर अनेक नावांनीही ओळखली जाते. पश्चिम बंगालमध्ये याला गुलाब जामुन, पंतुआ, गोलाप जाम आणि कालो जाम असेही म्हणतात. मध्य प्रदेशातील जबलपूर गुलाबजामसाठी खूप प्रसिद्ध आहे.