Girl Fight Viral Video : आजकाल सोशल मीडियावर हाणामारीचे व्हिडीओ जास्त चर्चेत आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी लोक डब्यातील महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. या लोकलमधील महिलांनी एकमेकींना केस ओढून मारहाण केली होती. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुणी 'WWE' प्रमाणे फ्री-स्टाईल हाणामारी करताना दिसत आहे. ही फ्री-स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.


तरुणींची मॉलमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी


सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुणींची 'WWE' फाईट पाहायला मिळत आहे. या चारही तरुणी गणवेशात असल्याचं पाहायला मिळत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस ओढून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका तरुणामुळे या तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुणी एकमेकींना अक्षरक्ष: जमिनीवर लोळवून फ्री-स्टाईल हाणामारी करताना दिसत आहे. यावेळी उपस्थितांपैकी काही जणांनी याचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ : चार तरुणींची मॉलमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी






फ्री-स्टाईल WWE हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल 


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 'घर के कलेश' ( Ghar Ke Kalesh) या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'मुलासाठी मॉलच्या बाहेर मुलींमध्ये राडा', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यानुसार, तरुणामुळे या चार तरुणींमध्ये भांडण लागल्याचं समोर येत आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


तरुणींमधील या फ्री-स्टाईल WWE हाणामारीला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून आतापर्यंत 20 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.