Congress Bharat Jodo Yatra in MP : काँग्रेसची ( Congress ) भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) सध्या मध्य प्रदेशात ( Madhya Pradesh ) आहे. महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेने महाराष्ट्राच्या जळगावमधील जामोद येथून बुरहानपूर मार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांची नक्कल केली.


राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल


जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भाषणात राहुल गांधी आपला रोजचा दिनक्रम सांगत आहेत. यावेळी ते सांगतात की, मी सकाळी लवकर उठतो रोज भरपूर चालतो, पण मला थकवा येत नाही. यावेळी शेवटी ते 'भाईयो और बहनो...' म्हणत पंतप्रधान मोदी यांची नक्कल काढताना दिसले. राहुल गांधी नक्की काय म्हणाले येथे दिलेल्या व्हिडीओमध्ये पाहा.


पाहा व्हिडीओ : जेव्हा राहुल गांधी पंतप्रधान मोदींची नक्कल करतात...






मी सकाळपासून रात्रीपर्यंत चालतो - राहुल गांधी


या व्हायरल व्हिडीओमध्ये राहुल गांधी भाषण देताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणतात, 'आताच कमलनाथजींनी मला विचारलं राहुल तुम्ही थकत नाही का? बंधू आणि भगिनींनो माझा चेहरा तुम्हाला थकलेला दिसतो का? मी दोन हजार किलोमीटर चाललो आहे. पण मला थकवा आलेला नाही. मला एका सेकंदासाठीही थकवा जाणवलेला नाही. मी दररोज सकाळी उठून चालायला सुरुवात करतो. मी जेवढ्या वेगान सकाळी चालतो, त्याहून अधिक वेगाने रात्री 8 वाजता चालतो. हा विचित्र प्रकार आहे. हे का होत आहे माहित नाही. मी दोन हजार किलोमीटर चाललो आहे.'


राहुल गांधींचा मिश्किल अंदाज व्हायरल


राहुल गांधी यांनी 'भाईयो और बहनो...' मिश्किल अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. राहुल गांधींचे हे शब्द ऐकताच जमाव राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देऊ लागला. राहुल गांधी काही वेळ थांबून घोषणाबाजी थांबवण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी यांनी 'भाईयो और बहनो...' म्हणताच जमावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर काही जण राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कमेंट करत आहेत तर काहीजण त्यांच्या विरोधातही आहेत.