Plane Landing Video : एका विमानाच्या लँडिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा विमान लँडिंगचा व्हिडीओ अक्षरक्ष: थरकाप उडवणारा आणि भन्नाट आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकजण अवाक झाला आहे. ग्रीसमधील विमानाच्या लँडिंगचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ग्रीसमध्ये समुद्र किनारी पर्यटक मजा-मस्ती करत असतात. यावेळी एक विमान किनाऱ्याच्या दिशेनं येतं. हे विमान लँडिंग करताना समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळून आणि विमान पर्यटकांच्या अगदी डोक्यावरून जातं.


व्हिडीओ बनवण्यासाठी पर्यटकांची गडबड


तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मजा करत आहेत. यावेळी अचानक एक प्रवासी विमान समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येते. पाहता-पाहता हे विमान समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ येते आणि पर्यटकांच्या डोक्यावरून जातं. यावेळी विमान किनाऱ्याकडे येताना पाहून पर्यटकांमध्ये व्हिडीओ बनवण्यासाठी गडबड सुरु होते. पर्यटक विमानाचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. 






लँडिंगसाठी प्रसिद्ध आहे विमानतळ


ग्रीसमधील स्कियाथोस विमानतळ (Skiathos Airport) वरील हा व्हिडीओ आहे. या एअरपोर्टल रनवे फक्त 1628 मीटर लांबीचा आहे आणि याच्या बाजूला समुद्र किनारा आहे. त्यामुळे हे एअरपोर्ट विमानाच्या खास लँडिंगसाठी प्रसिद्ध आहे. ही खास लँडिंग पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. दरम्यान WizzAir Airbus A321neo या विमानानं सर्वात कमी अंतरावरून केलेल्या लँडिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे स्कियाथोस विमानतळ 


ग्रीसमधील स्कियाथोस विमानतळ त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या विमानतळावर दररोज शेकडो पर्यटक विमानांचं लँडिंग पाहण्यासाठी येतात.