Bank Fraud: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमधून (Ujjain) सर्वांचं लक्ष वेधून घेणारी माहिती समोर आलीय. या परिसरात राहणाऱ्या एका चाय विकणाऱ्या व्यक्तीला काही लोकांनी रियल इस्टेट आणि फनी रिल्स बनवण्याचं काम दिलं. तसेच यासाठी त्याला दरमहिन्याला 25 हजार देण्याचं आमिष दाखवलं. दरम्यान, इंदूरमधील वर्ल्डकप चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये या तरुणाची 7 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्याचे अनेक बॅंक खाते उघडण्यात आले. सात दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या घरी परतला. परंतु, काही दिवसानंतर त्याच्या खात्यात लखोंचे व्यवहार होऊ लागले. त्यानंतर या व्यक्तीनं समोरच्या लोकांशी संपर्क साधला. त्यावेळी तुला यातून काही पैसे हवे असतील तर घे, असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर या व्यक्तीनं खात्यातून 18 लाख काढून घर खरेदी केली. परंतु, सत्य माहिती समोर येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मालवीय असं चाय विकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. राहुलला फनी रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगून महिन्याला 25 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. इंदूरमधील वर्ल्डकप चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये या तरुणाला 7 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्याची चार बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. राहुल हा सात दिवसांनी पुन्हा उज्जैनला आला आणि त्यानं आपल्या कामाला सुरुवात केलीय. मात्र, काही दिवसांनी राहुलच्या खात्यात दररोज 90 लाखांचे पेमेंट येऊ लागल्यानं तो चक्रावून गेला. हळूहळू त्यांच्या खात्यात 5 कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाली.  त्यानंतर राहुलनं समोरच्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्यावेळी जे काही सुरु आहे, त्याकडं दुर्लक्ष कर, तुला यातून काही पैसे हव असतील तर घे, असं सांगण्यात आलं. त्यानंतर राहुलं त्याच्या खात्यातून 18 लाख काढून घर खरेदी केलं. परंतु, घर खरेदी केल्यानंतर राहुलची चौकशी सुरु झाली. त्यानंतर त्यानं आपल्या मित्रासह जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 


याप्रकरणी एसएसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सीएसपी हेमलता अग्रवाल यांच्याकडे तपास सोपवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. राहुल हा त्याची आई जयश्री यांच्यासोबत राहतो. तो एका डोळ्यानं पाहू शकत नाही. दिवाळीच्या दहा दिवस आधी राहुलच्या चायच्या स्टॉलवर सौरभ नावाचा माणूस आला होता. त्यानेच राहुलला फनी रिल्स आणि रिअल इस्टेटचं काम करण्यास सांगितलं होतं. या बदल्यात महिन्याला 20-25 हजार रुपये कमावण्याचं आमिष दाखवलं.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha