Viral Video : जर आपल्या हातातून अंडी पडली तर? साहजिकच ती फुटतील. (Egg Drop From Space) अंडी 5 फुटांवरून पडली किंवा त्याहून जास्त फुटांवरून पडली तरी ती फुटण्याची शक्यता 99 टक्के असते. जर ती फुटली नाही, तर ते एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही, कारण अंड्याचे कवच जाड आणि मजबूत नसते. पण जर तुम्हाला सांगितले की, अंडी शेकडो किलोमीटर वरून खाली टाकली गेली आणि ती फुटली नाही, तर तुमचा विश्वास बसेल का? साहजिकच तुम्ही विचार करत असाल की, हे होऊच शकत नाही, हे अशक्य आहे, पण हे अशक्य मार्क रॉबर (Mark Robber) नावाच्या युट्युबरने (You Tuber) शक्य करून दाखवले आहे. होय, हे 100 टक्के खरे आहे. एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
अंतराळातून पृथ्वीवर फेकलं अंडं
यूट्यूबर मार्क रॉबरने हा अजब प्रयोग करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. एखादे अंडे अंतराळातून सोडले आणि ते फुटले नाही, यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही अनेक लोकांना अवकाशातून पृथ्वीवर उडी मारताना पाहिलं असेल, पण कोणीही अंतराळातून पृथ्वीवर अंडी फेकत नसेल.
मार्क रॉबरच्या या अजब प्रयोगाचा व्हिडीओ पाहा
रिपोर्ट्सनुसार, मार्क रॉबर नासामध्ये इंजिनिअर होते आणि आता एक यशस्वी YouTuber आहेत. याआधीही त्यांनी हा अनोखा प्रयोग केला होता, मात्र त्यांना त्यात यश मिळू शकले नाही. यापूर्वी केलेल्या प्रयोगात पृथ्वीवर येण्यापूर्वी अंडी फुटली, कारण अंडी नियंत्रित वेगाने अंतराळातून पृथ्वीवर सोडली गेली नाहीत. मात्र, मार्क रॉबरने या चुकीतून धडा घेत अखेर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
अंड रॉकेटमध्ये बसवून अंतराळात पाठवले
अंड रॉकेटमध्ये बसवून त्याने अंतराळात पाठवले आणि ते अशाच प्रकारे पृथ्वीवर परत आले, मात्र ती फुटली नाही. या प्रयोगासाठी त्यांना खूप पैसा खर्च करावा लागला. त्याच्या या कल्पनेवर तो बराच काळ काम करत होता. आणि हे अशक्य मार्क रॉबर नावाच्या युट्युबरने शक्य करून दाखवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या