Mosquito Bite Man In Coma : भारतात डेंग्यूचा (Dengue) प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत आहे. अशातच लोकांच्या मृत्यूची संख्याही वाढत असल्याची माहिती मिळत आहे. एखादा डास (Mosquito) चावला, तर त्यामुळे होणार्‍या आजारांवरही डॉक्टर सर्व प्रकारचे उपाय सांगत आहेत, पण नुकतेच जर्मनीतून (Germany) समोर आलेले प्रकरण ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला आहे. एका व्यक्तीला डास चावल्यामुळे चक्क 30 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.


मांडीवर चावला डास, कराव्या लागल्या 30 शस्त्रक्रिया
हे प्रकरण जर्मनीतील एका शहराचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीच्या मांडीला डास चावला होता. यानंतर, जेव्हा त्याला तिथे त्रास जाणवू लागला. तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला, परंतु हळूहळू याचा संसर्ग इतका पसरला की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर जो काही प्रकार घडला तो पाहून डॉक्टरांना धक्काच बसला, यातून त्या व्यक्तीला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.


संसर्ग इतका पसरला की...
रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णामध्ये संसर्ग इतका पसरला की त्याच्या यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांनी काम करणे बंद केले. यानंतर त्यांच्या मांडीचे ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांना वाटले की ऑपरेशननंतर या व्यक्तीची प्रकृती सामान्य होईल, पण तसे झाले नाही. हा संसर्ग आणखीनच वाढला. यानंतर डॉक्टरांना त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया त्याच्या मांडीवर कराव्या लागल्या.


'या' प्रजातीच्या डासाने घेतला चावा
या व्यक्तीच्या एकूण तीस लहान-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, त्यानंतर तो व्यक्ती चक्क कोमात गेला. या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी डास चावला होता, पण नुकताच तो कोमात गेल्याने हे प्रकरणा पुन्हा जगभर व्हायरल झाले. त्या व्यक्तीला एशियन टायगर प्रजातीच्या डासाने चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हे अतिशय धोकादायक डास आहेत.


हृदय आणि फुफ्फुसांनीही काम करणे बंद केले
रिपोर्टनुसार, रोडमार्क येथील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय सेबॅस्टियन रोत्शके यांना 2021 च्या उन्हाळ्यात एशियन टायगर डास चावल्यानंतर त्रास जाणवू लागला. तो डॉक्टरांकडे गेला पण हळूहळू संसर्ग इतका पसरला की त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला प्रथमच फ्लूसारखी लक्षणे जाणवली. संसर्ग इतका पसरला की विषामुळे त्याच्या यकृतासह किडनी, हृदय आणि फुफ्फुसांनीही काम करणे बंद केले. यानंतर 30 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.


इतर महत्वाच्या बातम्या


Viral Video : 'बुलेट राणी'... घागरा-चोली अन् डोक्यावर पदर, दुचाकी स्वार महिलेचा डॅशिंग अंदाज