Dolphin Interesting Fact : पृथ्वीवर (Earth) अनेक प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. काही प्राणी तर इतरांपेक्षा फार वेगळे आहेत. काही जीव त्यांच्या वेगळ्या सवयींमुळे ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका माशाबद्दल सांगणार आहोत. हा मासा त्याच्या सवयीमुळे चर्चेत असतो. हा मासा एक डोळा उघडून झोपतो. 


कोणता मासा एक डोळा उघडून झोपतो? (Dolphin Sleeps with One Eye Open)


हा मासा मानवाचा खूप चांगला मित्र मानला जातो. एक डोळा उघडा ठेवून झोपणाऱ्या या माशाचं नाव डॉल्फिन आहे. समुद्राबरोबरच भारतातील पवित्र गंगा नदीतही डॉल्फिन आढळतात. पण, गंगा नदीत आढळणाऱ्या डॉल्फिन माशांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली आहे. मात्र आता भारत सरकार डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी मोहीम राबवत असून त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.


काय आहे यामागचे कारण? (Why Do Dolphin Sleeps with One Eye Open)


डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा फक्त एक डोळा बंद करतात. जेव्हा मेंदूचा उजवा अर्धा भाग झोपतो तेव्हा डावा डोळा बंद होतो. याउलट मेंदूचा जेव्हा मेंदूचा डावा अर्धा भाग झोपतो तेव्हा उजवा डोळा बंद होतो. या प्रकारच्या झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' असे म्हणतात. 


झोपेत असताना श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी, अनेक जलचर सस्तन प्राणी ज्याला युनिहेमिस्फेरिक स्लीपचा वापर करतात. युनिहेमिस्फेरिक स्लीप म्हणजेच झोपताना त्यांचा अर्धा मेंदू कार्य करतो. यामध्ये झोपेत त्यांच्या मेंदूचा फक्त अर्धा भाग एका वेळी विश्रांती घेतो. त्यावेळी दुसरा अर्धा भाग काम करतो म्हणून डॉल्फिन एक डोळा उघडे ठेवून झोपतात.


डॉल्फिन मासे पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डॉल्फिन मासे पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत. डॉल्फिन मासा असूनही तो पूर्ण वेळ पाण्याखाली राहू शकत नाही. डॉल्फिन मासा पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही, म्हणूनच तो 2 ते 3 मिनिटांनी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो आणि श्वास घेतो. कधीकधी डॉल्फिन मासा 5 ते 7 मिनिटे श्वास रोखू शकते आणि पाण्यात राहू शकतात.


तेलासाठी शिकार केली जाते डॉल्फिनची शिकार


डॉल्फिन माशांची शिकार त्याच्या मांसासाठी आणि मांसापासून बनवलेल्या तेलासाठी केली जात होती. मांसापासून बनवलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी असून हे तेल चढ्या दराने विकले जाते. यामुळेच जगभरात डॉल्फिन माशांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. पण, आता अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्थांनी डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.


'अशी' शिकार करतो डॉल्फिन मासा


डॉल्फिन मासे कळपाने शिकार करतात. डॉल्फिन मासा शिकारीसाठी शरीरातून एक विचित्र प्रकारची ध्वनी लहरी उत्सर्जित करतो. या ध्वनी लहरी शिकाराच्या शरीरावर आदळून डॉल्फिनकडे परत येतात. यावरून डॉल्फिनला शिकार किती मोठा आहे आणि तो त्याच्या किती जवळ आहे समजते. त्यानंतर, अशाच ध्वनी लहरी वापरून डॉल्फिन त्याचा संपूर्ण कळपाला सावध करतो आणि ते सर्व एकत्र शिकार करतात.