Deer Frozen Face Viral Video : अमेरिका (America) आणि कॅनडात (Canada) हिमवादळामुळे (Blizzard) जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंड वारे आणि बर्फवृष्टी यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. माणसांप्रमाणे प्राण्यांचीही परिस्थिती फार बिकट झाली आहे. हिमवादळ आणि बर्फवृष्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील एका हरणाला पाहून तुम्ही कल्पना करू शकता की येथील हिमवादळामुळे माणसे आणि प्राण्यांचे किती हाल झाले आहेत.


अमेरिका आणि कॅनडा सध्या हिमवादळाशी झुंज देत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे येथील लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा फटका माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही बसला आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये एक हरणाचे थंडीमुळे झालेले हाल दिसत आहेत. या हरणाचे तोंड बर्फामुळे पूर्णपणे गोठले आहे.


एका हरणाचे तोंड बर्फाने पूर्णपणे गोठल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर या हरणाचे डोळे आणि कानही बर्फाने झाकले गेले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की, त्या हरणाला याचा किती त्रास होत असेल आणि हरणात किती कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल. काही जणांनी अंदाज व्यक्त केला आहे की, हरीण तोंडाच्या मदतीने बर्फामध्ये अन्न शोधण्याचा प्रयत्न करत असावा. अन्नासाठी खोदण्याचा प्रयत्न करताना त्यांचे तोंड बर्फामध्ये गोठले असावे.


पाहा व्हायरल व्हिडीओ






गिर्यारोहकांनी 'असा' वाचवला जीव


दोन गिर्यारोहकांनी या अडचणीत असलेल्या हरणाला पाहिले. हरणाची वाईट अवस्था पाहून गिर्यारोहकांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेत त्याची सुटका करण्याचे ठरवले. गिर्यारोहकांना पाहून सुरुवातीला हरण घाबरून पळू लागला, पण नंतर दोघांनीही हरणाला पकडले आणि गोठलेल्या बर्फातून त्याचे तोंड हळूहळू मुक्त केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आङे.


दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ सध्याच्या हिमवादळाच्या परिस्थितीतील आहे की, याआधीचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.