Sachin Tendulkar Net Worth: जागतिक क्रिकेटमध्ये भारताचं नाव उज्ज्वल करणारा महान क्रिकटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज सचिनने त्याच्या वयाची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले आहेत. यामध्ये जगात सर्वाधिक 100 शतके करण्याच्या अनोख्या विक्रमाचाही समावेश आहे. तसेच सर्वाधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सचिनने नोव्हेंबर 2013 निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतरही त्याने क्रिकेटशी नातं जोडलं आहे. ते आजही अबाधित आहे. यावर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर 51 व्या क्रमांकावर होता.


याचा अर्थ, फक्त क्रिकेटच नव्हे तर अन्य माध्यमातूनही सचिन आर्थिक कमाई करतो. सचिन प्रीमियम बॅंडमिंटन लीग, इंडियन सुपर लीगची फ्रेंजायची असून केरळ ब्लास्टर्स आणि बंगलोर ब्लास्टर्स या संघाचा मालकही आहे. याशिवाय सचिनकडे मुंबईच्या संघाची फ्रेंजायजी आहे. तसेच हॉटेल्स आणि इतर कंपन्यात केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून सचिनची कमाई सुरु असते.


सचिनची कोणकोणत्या कंपन्यात गुंतवणूक आहे?


सचिनने क्रिकेट व्यतिरिक्त कमाईचे काही स्त्रोत निर्माण केले आहेत. सचिन दोन रेस्टॉरंचा मालक असून मुंबई आणि बंगलोरमध्ये हे रेस्टॉरंट सुरु असल्याचं समजतं. या रेस्टॉरंटला सचिन तेंडुलकरचेही नावही देण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटला Sachin’s and Tendulkar’s असं नाव दिलं आहे. सचिनची 70 टक्के कमाई हॉटेल आणि फ्रेंजायजीच्या माध्यमातून केली आहे, असा अंदाज आहे. 


या कंपन्यांचा मालक आहे सचिन


सचिन तेंडुलकरने अनेक स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. यामध्ये स्मार्ट्रोन इंडिया, जेटसिंथेसिस, एस. ड्राईव्ह, सच आणि स्पिनी यासारख्या स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे.  याशिवाय 2016 मध्ये अरविंद फॅशन लिमिटेड या कंपनीसोबत ट्रू ब्लू नावाची एक मेंस वेअर कंपनी सुरुवात केली आहे. यानंतर सचिनने त्याची पत्नी अंजली तेंडुलकरसोबत SRT स्पोर्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी सुरु केली. या कंपन्याच्या माध्यमातून सचिनची कमाई आहे.


सचिनची एकूण किती संपत्ती आहे? 


सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1350 कोटी असल्याचं म्हटलं जातं.  पण सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश असून संपत्तीच्या बाबतीत सचिनच पुढे आहे. सचिन त्याच्या जाहिराती आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून महिन्याला जवळजवळ 50 कोटी रुपयांची कमाई आहे.