Couple Romance Video Viral: चालत्या बाईकवर रोमान्स (Romance) करणं आता प्रेमीयुगुलासाठी अगदी सामान्य झालं आहे. अलीकडच्या काळात असे अनेक व्हिडिओ (Video) समोर आले, ज्यात प्रेमीयुगुल चालत्या बाईकवर (Bike) रोमान्स करताना दिसले आहेत. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे कपल भरधाव वेगात असलेल्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. त्याचवेळी कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर नॅशनल हायवेचा NH-9 असल्याचं सांगण्यात येत आहे.


जोडप्याने नेमकं केलं काय?


व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, बाईकवर बसलेल्या जोडप्याने वाहतूक नियमांचा फज्जा उडवला आहे. बाईकवर बसलेला तरुण भरधाव वेगात बाईक पळवत आहे आणि त्याच्यासमोर त्याची प्रेयसी त्याला घट्ट मिठी मारुन बसली आहे. या मुलाची प्रेयसी पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे.


बाईक चालवणाऱ्या मुलाने हेल्मेट देखील घातलेलं नाही, त्यामुळे या जोडप्याने रस्ता सुरक्षा नियमांचाही उल्लंघन केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. व्हिडीओ व्हारल झाल्यावर जोडप्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही अनेक जणांनी वाहतूक पोलिसांकडे केली.






पोलिसांनी ठोठावला दंड


मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सिंभावली पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 9 वर घडला आहे. या जोडप्याच्या कृत्यावर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच हापूर पोलिसांनी या जोडप्याला मोठा दंड ठोठावला आहे. दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यानुसार आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे.






व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले


उघड्यावर रस्त्यावर अशी कृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर लोकांनी या जोडप्याला चांगलंच सुनावलं आहे. एका व्यक्तीने म्हटलं, हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं, यांना वाटतं लोक यांच्या प्रेमाला समजून घेतील. मागील काही दिवसांपासून भररस्त्यात बाईकवर रोमान्स करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


हेही वाचा:


Israel Hamas War: माणसांप्रमाणे प्राण्यांवरही झाडल्या जात आहेत गोळ्या; पाहा हमासच्या सैनिकांच्या प्रवृत्तीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ