जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांमध्ये भारताचा आज पहिला नंबर लागतो. काही महिन्यांपूर्वी भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकलं. देशाची वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळेच, सरकारकडून लोकसंख्या कमी करण्याच्यादृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णयही घेतले जातात. हम दो हमारे दो... असे म्हणत भारतीय नागरिकांनी केवळ 2 मुलांनाच जन्म द्यावा, असा प्रचार आणि प्रसारही सरकारने केला आहे. तर, काही योजनांद्वारेही सरकारकडून याबाबत जनजागृती केली जाते. दरम्यान, कंडोम हेही लोकसंख्या नियंत्रित आणण्याच्या योजना प्रकियेतील एक भाग आहे. भारतात कंडोमला निरोध हे नाव देण्यात आलं असून हे नाव नेमकं कसं पडलं, यामागची मजेशीर गोष्ट काय आहे हे सहजा आपल्याला माहिती नाही. मात्र, या लेखातून तुम्हाला या नावामागील मिश्कील गोष्ट उलगडली जाणार आहे. 


देशातील वाढती लोकसंख्या (Poppulation) कमी करण्याचं आव्हान हे केवळ आत्ताच्या सरकारला नाही, तर यापूर्वीच्या सरकारपुढेही हे आव्हान अबाधित होते. त्यातूनच, सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कंडोमचा (Condom) वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. भारत (India) हा जगातील पहिला देश आहे, ज्याने कुटुंब नियोजन हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1952 साली कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये वेळेअनुसार अनेक बदल होत गेले. त्यामध्ये, कुटुंब नियोजनाचा उत्तम आणि सहज पर्याय म्हणजे कंडोमचा वापर करणे हाही होता. त्यामुळे, याच्या वापरासाठी जनजागृती मोहिमही राबविण्यात आली आहे. 


सन 1963 मध्ये सरकारने पहिल्यांदा देशात मोठ्या प्रमाणात कंडोम वाटण्याचं काम केलं, सरकारकडून मोफत कंडोम वाटवण्याची योजनाच सुरू झाीली होती. त्यावेळी, कंडोम या ब्रँडचे नाव कामराज असं ठेवण्यात आलं होतं. भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या इतिहासाता कामदेव हा यौनसंबंधी आकर्षण असलेला देव मानला जातो. कामदेवचं दुसरं नाव कामराज असेही आहे. काम यांचा अर्थ संभोग आणि काम वासना याचा अर्थ संभोगाची इच्छा असा लावण्यात येतो. 


असे बदलले कंडोमचे नाव


मिडिया रिपोर्टंसनुसार, त्यावेळी कामराज हे कंडोम नावासाठी पर्यायी नाव समोर आले होते. मात्र, त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष के. कामराज हे होते. काँग्रेसमध्ये पंडीत नेहरु यांच्यानंतर ताकदवान नेते म्हणून के. कामराज यांची ओळख होती. ते एप्रिल 1954 ते ऑक्टोबर 1963 पर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेस पक्षात त्यांची मोलाची व महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच, कंडोमला सूचविण्यात आलेला पर्यायी शब्द कामराज हा नाकारण्यात आला. त्यानंतर, कंडोमसाठी पर्यायी शब्द निरोध हा ठेवण्यात आला. निरोध ह्या शब्दाचा अर्थ सुरक्षा असा होतो, आयआयएममधील एका विद्यार्थ्याने कंडोमला निरोध हा पर्यायी शब्द सूचवला होता. 


हेही वाचा


काँग्रेस अन् नॅशनल कॉन्फरन्सचं ठरलं, जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर, पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढती, कोण किती जागा लढणार?