मुंबई : आपल्या खाद्यसंस्कृतीत विविधता आहे, प्रत्येक भागातली खास अशी वेगळी खाद्यसंस्कृती आहे. पण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात नवनवीन प्रकारच्या रेसिपी जन्माला येत आहे. त्यामध्ये अगदी काहीही मिक्स करून काहीही पदार्थ तयार करण्याचा फंडा आता व्हायरल होत आहे. अनेक वेळा हा फंडा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी वापरला जातो. या अनुषंगाने अन्नाबाबतही विचित्र प्रयोग पाहायला मिळतात. कधी कुणी मॅगीपासून कुल्फी बनवताना दिसतो, तर कधी कुणी आईस्क्रीम पकोडे बनवण्याचा प्रयत्न करतो. असाच एक नवीन पदार्थ व्हायरल होत असून फॅन्टा या कोल्ड्रिंकचा वापर करून ऑम्लेट केल्याचं दिसतंय.  


या अनोख्या खाद्य प्रयोगाचा व्हिडिओ @foodandstreet ने Instagram वर शेअर केला आहे. तो आता वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोलकाता येथील एक रस्त्यावरील विक्रेत्याला फॅन्टा या नारिंगी चवीच्या फिजी ड्रिंकमध्ये ऑम्लेट करताना दाखवले आहे.


तुम्हाला हे अनोखे फ्लेवर कॉम्बिनेशन वापरून पहायचे आहे का? 


व्हायरल व्हिडिओमध्ये, विक्रेता प्रथम फँटाची संपूर्ण बाटली गरम पॅनमध्ये ओततो. पुढे त्यामध्ये सहा अंडी फोडली जातात. त्यामध्ये थोडं मिठ टाकलं जातं आणि नंतर मिश्रण ढवळण्यास सुरुवात करतो. परिणामी एक विचित्र दुधाळ-नारिंगी पदार्थ तयार होतो.


अंडी शिजायला लागल्यावर, विक्रेता त्यामध्ये ताजे टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची आणि टाकतो. याला 'ऑरेंज अंडा भुर्जी' असे नाव देण्यात आले आहे, जे पानांपासून बनवलेल्या पारंपरिक प्लेटवर सर्व्ह केले जाते. 


 




व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'कोलकाताचे सर्वात अनोखे कोल्ड ड्रिंक ऑम्लेट. जेव्हा तुमचे तेल संपले आणि फ्रिजमध्ये फक्त फॅन्टा शिल्लक राहते तेव्हा असे होते'.


हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत तो 180 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याला लाईक्सही लाखोंमध्ये आल्याचं दिसतंय. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होत आहेत. असं कॉम्बिनेशन कसं असेल यावर चर्चा सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विचित्र कॉम्बिनेशनचा आस्वाद घेण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्याच्या दुकानात रांग लागल्याची माहिती आहे.


या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच प्रकारच्या येत आहेत. एका युजरने गंमतीत म्हटलंय की, हा असा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी नाश्ता आणि कोल्ड्रिंक दोन्ही बनवू शकता. तर दुसऱ्या यूजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिलंय की, मी या आधी सर्व काही पाहिले होते, पण आता हे फंटासोबत अंडी? खरंच? एकाने लिहिलंय की, मी साधी अंडी भुर्जी खाण्यास प्राधान्य देईन, धन्यवाद, तथापि, काही लोकांनी यावर विनोदी कमेंटही केली आहे. जेव्हा तेल संपते आणि फ्रिजमध्ये फक्त फंटा शिल्लक राहतो तेव्हा हे असे होते असं म्हटलं आहे.