China Driving Test Viral Video : तुम्ही बाईक किंवा कार चालवत असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) असणे आवश्यक आहे. पण ते बनवण्यासाठी प्रत्येकाला परीक्षा म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्ट लागते. भारतात लोकांना सहज परवाना मिळतो, परंतु असे काही देश आहेत जिथे ही चाचणी उत्तीर्ण होणे ही एक मोठी गोष्ट आहे. सध्या चीनमध्ये होणाऱ्या अतिशय कठीण ड्रायव्हिंग टेस्टचा (China Driving Test Viral Video) एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याला पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की, ड्रायव्हिंग टेस्ट किती कठीण आहे?


ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचंय? तर तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील.
चायनीज ड्रायव्हिंग टेस्ट व्हायरल होताना पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, ड्रायव्हर पांढऱ्या रंगाच्या आठ चिन्हात अनेक वळणदार रस्त्यांवरून गाडी चालवत आहे. यानंतर अनेक अवघड ठिकाणी पार्किंगही करत आहे. या दरम्यान कार एका बाह्यरेखाला स्पर्श करत नाही. अशा परिस्थितीत, जर या कठीण परीक्षेत, जर एखाद्याच्या कारने शेवटच्या पांढऱ्या रेषेला स्पर्श केला, तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही. नवीन चालकांसाठी हे अवघड काम मानले जाते. व्हिडीओवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, जर तुम्हाला चीनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील.


अवघड ड्रायव्हिंग चाचणीचा व्हिडीओ येथे पाहा


 







नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
अवघड ड्रायव्हिंग टेस्टचा हा व्हिडीओ टॅन्सू येन नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत लिहिले आहे की, 'ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट स्टेशन इन चायना.' ही 48 सेकंदाची व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तर 1.8 लाख लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही