Water Car Video : जगभरातील (World) तंत्रज्ञानात (Technology)  दिवसागणिक वाढ होत आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत नवनवीन आधुनिक आणि शोध लावले जात आहेत. तंत्रज्ञानामुळे सध्याचं मनुष्य जीवन फारच सोपं झालं आहेत. ज्या गोष्टींचा मानवानं कधी विचारही केला नव्हता अशा गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. माणूस चंद्रावरही जाऊन पोहोचला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे अनेक व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच 'पाण्यावर चालणाऱ्या कार'चा (Car Boat) व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलंय 'पाण्यावर चालणारी कार'. ही कार रस्त्याप्रमाणे पाण्यावरही तुफान वेगं धावते. व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा हे खरं आहे की खोटं.


हा 'कार बोटी'चा (Car Boat) व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही यावर विश्वास बसणं कठीण होईल. तुम्हालाही प्रश्न पडेल की, पाण्यात गाडी इतक्या वेगानं  कशी धावू शकते. आता हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहा. यानंतरच तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाला उत्तर मिळतील.






पाण्यावर वेगानं धावते 'ही' कार
सोशल मीडियावर पाण्यावर वेगानं धावणाऱ्या कारनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये आकाशी आणि काळ्या रंग असलेली एक कार दिसत आहे. ही कार एखादी रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य कारप्रमाणे दिसत आहे. मात्र या कारमध्ये खासियत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ही कार पाण्यावरही तुफान वेगानं चालते. व्हिडीओमधअये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ही गाडी जमिनीवरून चालवत पाण्यात नेतो. यावेळा कारचे टायर वर जातात आणि गाडी पाण्यावर तरंगू लागते. यानंतर इंजिन सुरु होऊन या कारचं रुपांतर एका बोटीमध्ये होतं आणि ही गाडी पाहता पाहता पाण्यावर वेगाने चालू लागते.


कार बोटीचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ the_nature_110 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. 29 मे रोजी अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे अडीच लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ही अनोखी कार पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.