World Ocean Day 2022 : पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 71 टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल 97 टक्के जलसाठा हा खाडय़ा, समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे. UN च्या अहवालात असे सूचित केले आहे की, महासागर केवळ ग्रहाच्या 50% ऑक्सिजनचे उत्पादन करत नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कोटी लोकांचे व्यवहार हे महासागरावर आधारित आहेत. जागतिक महासागर दिन साजरा करण्यामागचा उद्देश मानवी जीवनात समुद्राच्या फायद्यांविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. मानवी जीवन महासागरांशी किती खोलवर जोडलेले आहे आणि महासागरांप्रती त्याची जबाबदारी काय आहे हे समजून घेण्याची ही संधी आहे. 


जागतिक महासागर दिनाचा इतिहास 2022 (World Ocean Day History 2022) : 


जागतिक महासागर दिवस दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने आपला जगाचा सामायिक महासागर आणि समुद्राशी असलेले आपले वैयक्तिक संबंध साजरे करण्यासाठी 8 जून हा दिवस 'जागतिक महासागर दिवस' म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. समुद्र आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि लोक त्याचे संरक्षण करू शकतील अशा महत्त्वाच्या मार्गांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील हे चिन्हांकित आहे.


जागतिक महासागर दिनाची थीम 2022 (World Ocean Day Theme 2022) : 


2022 ची जागतिक महासागर दिनाची थीम आहे पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती: "समुदाय, कल्पना आणि उपायांवर प्रकाश टाकणे जे महासागराचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत आणि ते टिकून राहतात."


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्वाच्या बातम्या :