Brazil News: ब्राझिलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझिलमध्ये (Brazil) असलेल्या अ‍ॅमेझॉन नदीच्या (Amazon River) खोऱ्यात जवळपास 100 डॉल्फिन (Dolphins) मृतावस्थेत आढळून आले आहेत. फक्त डॉल्फिनच नाही, तर इतर हजारो माशांचा देखील मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अ‍ॅमेझॉन नदीत (Amazon River) विविध-विविध प्रजातींचे डॉल्फिन मोठ्या प्रमाणात आढळतात. पण आता या डॉल्फिनचा मृत्यू (Dolphins Died) होत असल्याने ही प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या तापमानवाढीमुळे (Temperature Rise) हे मासे मरत असल्याचा अंदाज आहे.


अ‍ॅमेझॉन नदीत मोठ्या प्रमाणात डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने हे पाहून तेथे उपस्थित असलेले लोक भयभीत झाले. जीवशास्त्रज्ञ आणि इतर तज्ञांनी संरक्षणात्मक कपडे (Protective Clothes) आणि मास्क परिधान करून मृत डॉल्फिन नदीतून बाहेर काढले आणि त्यांच्या मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलं.


इतक्या मोठ्या प्रमाणात कसा झाला डॉल्फिन्सचा मृत्यू?


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच जवळपास 120 डॉल्फिन पाण्यावर तरंगताना मृतावस्थेत आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या मृत्यूचं कारण अतिउष्णता आणि भीषण दुष्काळ आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, तीव्र दुष्काळ हे त्यांच्या मृत्यूचं कारण आहे. उष्णतेमुळे नदीची पाणी पातळी कमी होते आणि पाणी इतकं गरम होतं की डॉल्फिन ते तापमान सहन करू शकत नाहीत. अलीकडेच अॅमेझॉन नद्यांमध्ये पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो माशांना जीव गमवावा लागला आहे.


अतिउष्ण तापमान डॉल्फिनसाठी घातक


सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या तापमानवाढीमुळे मागील सात दिवसांमध्ये हे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे. सातत्याने होणारा पर्यावरण बदल तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातील तापमान 39 अंशांवर पोहोचलं आहे, जे डॉल्फिन्सच्या जीवासाठी घातक आहे. डॉल्फिनला थंड पाण्याची सवय असते, अतिउष्णतेमुळे त्यांचा मृत्यू होतो, असं संशोधनातून समोर आलं आहे.


पर्यावरणीय बदलांमुळे नदी कोरडी


जगातील सर्वात मोठा जलमार्ग असलेली अ‍ॅमेझॉन नदी, ही जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखले जाते. पण सततचा दुष्काळ आणि ऐतिहासिक पर्यावरणीय बदलांमुळे ती कोरडी पडू लागली आहे. परिणामी या नदीतील सर्वच माशांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरं जावं लागत आहे.


हेही वाचा:


Jaipur: तरुणाने Money Heist स्टाईलमध्ये पाडला पैशांचा पाऊस; पैसे उचलायला लोकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल