Most Expensive Eggs : जगभरात (World) सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपैकी एक म्हणजे अंडी (Eggs). नॉन व्हेज (Non-Veg) प्रेमींप्रमाणे काही अंडी प्रेमीही आढळतात, ज्यांना एगिटेरियन (Eggetarian) असंही म्हटलं जातं. जगभरात पांढऱ्या रंगाची कोबंडीची अंडी सर्वाधिक प्रमाणात खाल्ली जातात. याशिवाय जगभरात बदक, शहामृग अशा विविध पक्षांची अंडी खाल्ली जातात. आरोग्याच्या दृष्टीने कोंबडीची हलक्या गुलाबी रंगाची अंडी म्हणजे गावठी अंडी फायदेशीर मानली जातात. या  अंड्यांचा दर 20 ते 25 रुपये असतो. ही अंडी थोडी महाग असल्याने खिशाला परवडणारे लोक ही अंडी खातात. सर्व साधारणपणे कोंबडीची अंडी 5 ते 6 रुपयाने मिळतात. पण तुम्ही जगातील सर्वात महागड्या अंड्याबद्दल ऐकलं आहे का... या अंड्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 


जगातील सर्वात महाग अंडे कोणतं?


जगातील सर्वात महागडे (Most Expensive Egg) अंडे रोथस्चाइल्ड फेबर्ज ईस्टर (Rothschild Faberge Easter Eggs) हे आहे. या अंड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. जणू सर्वसामान्य व्यक्तीला तर या अंड्याचं स्वप्नही महागात पडेल.


जगातील सर्वात महागड्या अंड्याची किंमत किती?


जगातील सर्वात महागड्या Rothschild Faberge Easter Eggs अंड्याची किंमत 9.6 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे 78 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. विकिपीडियानुसार, रोथस्चाइल्ड फेबर्ज ईस्टर अंडे पूर्णपणे हिरेजडीत आहे. या इस्टर अंड्यावर अनेक प्रकारचे हिरे जडलेले आहेत. यासोबतच हे अंडे सोन्याने मढवलेले आहे. त्यामुळे हे अंडे खाण्यायोग्य नाही. हे एक कृत्रिम अंडे शोभेची वस्तू आहे.


मिराज इस्टर एग्ज दुसऱ्या क्रमांकावर


यानंतर जगातील दुसरं महागडं अंडे मिराज इस्टर एग (Mirage Easter Eggs) आहे. Mirage Easter Eggs ची किंमत 8.4 दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजेच, भारतीय रुपयात सुमारे 69 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे अंडे 18 कॅरेट सोन्याने बनवलेल्या या अंड्यावर 1000 हिरे जडलेले आहेत. हे अंडे पाहिल्यावर एक मोठा हिरा चमकत असल्याचा भास होतो.


डायमंड स्टेला इस्टर एग तिसऱ्या क्रमांकावर


डायमंड स्टेला इस्टर एग (Diamond Stella Easter Eggs) जगातील तिसऱ्या क्रमांकाचं महागडं अंडे आहे. Diamond Stella Easter Eggs ची किंमत सुमारे 82 लाख रुपये आहे. हे देखील जगातील सर्वात महाग इस्टर अंड्यांपैकी एक आहे. हे अंडे चॉकलेटसारखे दिसते, पण अंड्यावरही हिरे आणि सोन्याचे नक्षीकाम करण्यात आले आहे.