Viral News : बोर्डाची (Board Exams) परीक्षा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हटंली जाते, या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. तर काही विद्यार्थी चक्क कॉपी करतानाचेही प्रकार समोर आले आहे. पण एका विद्यार्थीनीचा पेपर सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. कारण या पेपरमध्ये तिने जे काही लिहलंय ते वाचून शिक्षकही हैराण झाले आहेत. बिहार बोर्डाच्या (Bihar Board Exams) दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेला पेपर व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कविता तर काहींनी भावनिक चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. एका विद्यार्थीनीने तर पेपरच्या माध्यमातून चक्क शिक्षकांना विनंती केली आहे की, सर मला पास करा, नाहीतर वडील माझे लग्न लावतील. 



परीक्षेच्या कॉपीमध्ये विद्यार्थ्यांनी काय लिहिले?


बिहार येथील अराहच्या मॉडेल स्कूलमध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा पेपर तपासताना ही घटना घडली. परीक्षा संपल्यानंतर आता उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले जात आहे. तपासल्या जात असलेल्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी विचित्र उत्तरे लिहिली आहेत. एका विद्यार्थ्याने लिहलंय की, माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. मला पास करा. तर एका विद्यार्थीनीने भावनिक चिठ्ठी लिहिली आहे - 'माझे वडील शेतकरी आहेत. अभ्यासाचा खर्च ते उचलू शकत नाही. म्हणूनच ते आम्हाला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटलंय की, जर मी परीक्षेत पास झाली नाही तर ते अभ्यास करू देणार नाहीत आणि माझे लग्न लावून देतील. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना 400 रुपयेही मिळत नाहीत आणि ते मला कसे शिकवणार? ही एक समस्या आहे आणि दुसरे काही नाही असं तिनं म्हटंलय.


 




 


कुणी कविता लिहिली, कुणी प्रार्थना तर कुणी भावनिक चिठ्ठी...


बिहार मंडळाने जिल्ह्यात कॉपी तपासण्यासाठी सहा केंद्रे तयार केली आहेत. मूल्यांकनादरम्यान, शिक्षकांना त्यांच्या वहीत कविता, शायरी, प्रार्थना आणि नोट्स सापडत आहेत. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणिताच्या वहीतही भावनिक नोट्स लिहिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका या भोजपूरमध्ये मूल्यमापनासाठी आल्या आहेत. या प्रती शिक्षक तपासत आहेत. ज्याप्रमाणे मॅट्रिकची परीक्षा काटेकोरपणे घेण्यात आली, त्याच पद्धतीने मूल्यांकनही घेण्यात येत आहे.


 


 


हेही वाचा>>>


Delhi : तरुणाने 'बॉडी' बनवण्याच्या नादात 39 नाणी, 37 चुंबक गिळले, सोपा मार्ग पडला महागात! डॉक्टरही पडले बुचकळ्यात