bald bride neehar sachdeva : दोन महिन्यांपूर्वी झालेला एक विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण टक्कल पडलेलं असताना निहार सचदेवा नावाची नवरी बोहल्यावर चढली होती. मात्र, तिच्य सौंदर्यात कोणतीही कमी राहिली नव्हती. तिनं सर्वांनी मने जिंकली होती. बोहल्यावर चढत असताना तिचा आत्मविश्वास थोडा सुद्धा कमी झालेला नव्हता. सध्या तिचे प्री वेडिंग कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाले आहेत. निहारचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
कोणत्याही मुलीच्या सौंदर्यामध्ये तिचे केसांची स्टाईल ही चर्चेचा विषय असते. कोणत्या तरी कारणाने डोक्यावर केस नसले तर लोक त्यांची चेष्टा करायला लागतात. Alopecia areata या आजाराने पीडित निहार सचदेवासोबतही असेच काहीसे घडले आहे. मात्र, लोकांचे कठोर शब्द निहारच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकले नाहीत. त्यानंतर, 2 महिन्यांपूर्वी, तिने टक्कल पडलेलं असताना नवरी बनत बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांची मने जिंकली आहेत.
विशेष बाब म्हणजे निहार आता तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये निहार तिच्या नवऱ्यासोबत अतिशय सुंदर दिसत आहे. लहानपणी आजारपणामुळे नीहरचे केस गळले होते आणि तिला हे सर्वांपासून लपवायचं नव्हतं. त्यामुळे लग्न आणि मेहंदीच्या वेळीही तिने wig घातली नव्हती. तर लेटेस्ट लूकमध्ये ती लेहेंगा आणि साडी सोडून स्कर्ट घालून फोटोशूट करताना दिसली आहे.
भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या निहर सचदेवाने 19 जानेवारी 2025 रोजी तिचा बॉयफ्रेंड Arun V Ganapathyसोबत लग्न केले. आता दोन महिन्यांनंतर मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये हे नवं दाम्पत्य फॅशन डिझायनर सिद्धार्थ बन्सल आणि कपड्यांचा ब्रँड PERTE D'EGO च्या आउटफिट्समध्ये दिसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या