Shri Swaminarayan Mandir Sarangpur High Voltage Wedding: अंबानी म्हटलं की, अगदी परिसाच्या झाडाप्रमाणे वाटतं. त्यांच्याकडे काय नाही? असा प्रश्नही आपल्याला पडत नाही. अंबानी म्हणजे, भव्यदिव्य, आलिशान, शाही, अशीच विशेषणं समोर येतात. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सर्वात सर्वात धाकट्या चिरंजीवाचा, म्हणजेच अनंत अंबानींचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. राधिका मर्चंट हिच्यासोबत अनंत अंबानीनं आपली लग्नगाठ बांधली. दोघांचा शाही विवाह सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. देश-विदेशातील नामांकीत दिग्गजांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. 

अंबानींच्या लेकाच्या शाही विवाहसोहळ्याला तब्बल   5000 कोटींचा खर्च झाल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. पण, आता अंबानींच्या लग्नाला टक्कर देणारं लग्न, फक्त टक्कर देणारं नाही हा... अंबानींच्या शाही विवाहसोहळ्यापेक्षा वरचढ ठरणाऱ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता तुम्ही म्हणला, अंबानींपेक्षा लग्नात जास्त खर्च करणारे हे आहेत तरी कोण? पण खरं सांगायचं तर, श्रीमंती, किमती दागिने याबाबत तर हे लग्न अंबानींना टक्कर देऊ शकत नाही. पण, वधू-वराचा मंदिर परिसरातील अंदाज सर्वांना शाही फिलिंग देणारा आहे. नवविवाबित जोडप्याच्या शाही लूकची तर सारेच वाहवाह करत आहेत.

खरंतर, गुजरातमधील सारंगपूर येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण शिखरबद्ध मंदिर 1916 मध्ये बांधलं गेलं. हे राज्यातील दुसरं सर्वात उंच मंदीर आहे. जिथे पार पडलेल्या एका जोडप्याच्या लग्नानं सर्वांची मन जिंकली. लग्नाच्या ठिकाणापासून ते वधू-वरांच्या कपड्यांपर्यंत, लग्नाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत शाही भव्यता दिसून येत होती. म्हणूनच, या सुंदर लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवरदेवाचा लूक अंबानींच्या लेकापेक्षाही वरचढ

सुंदर मंदिराच्या आवारात पार पडलेल्या विवाहसोहळ्यासाठी नववधूनं लाल रंगाचा लेहंगा निवडला, तर नवरदेवानं ऑफ व्हाईट कलरची शेरवानी घातली होती. ज्यावर सुंदर जरीची नक्षी होती. त्यासोबतच नवरदेवानं चुडीदार स्टाईल वेअर केला होता. तर, बेज कलरची जरी असलेला स्टोलही कॅरी केला होता. ज्यासोबत मॅचिंग पगडी घातलेल्या नवरदेवाचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता. 

नववधूचं लाघवी सौंदर्य 

नववधूचा लूक आणि त्यामध्ये तिचं सौंदर्य अत्यंत लाघवी होतं. पारंपरिक लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये नववधू खुपच सुंदर दिसत होती. लेहेंग्याच्या कळ्यांच्या काठावर सोनेरी भरतकाम करण्यात आलं होतं, तर हत्ती आणि फुलांच्या वेलींच्या नक्षीनं लेहेंग्याला एकदम क्लासी लूक देण्यात आलेला. तिचा ब्लाऊजही सुंदर नक्षीकाम केलेला होता.