70 years old man gets married to 30 years old bride : लगीनसराईच्या दिवसात सोशल मीडियावर अनेक लग्नांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, काही लग्नांतील दृश्य सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय बनली आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर एका चाचांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. एक चाचा वयाच्या 70 व्या वर्षी स्वत:चं आयुष्य सेट करताना दिसत आहेत. एकीकडे अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटांच्या बातम्या येत आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात विवाहानंतरच्या समस्या वाढलेल्याही समोर आलंय. मात्र, दुसरीकडे चाचा वयाच्या 70 व्या वर्षीही जीवनाचा आनंद घेताना दिसत आहेत. 

70 वर्षीय चाचांना मिळाली 30 वर्षीय नवरी 

इस्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका 70 वर्षीय चाचांनी 30 वर्षीय मुलीशी विवाह केलाय. या व्हिडीओमध्ये 70 वर्षीय नवरदेव नवरीला लग्नाचा हार घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे चाचाची नवरी त्यांच्या मुलीच्या वयापेक्षाही लहान असल्याचं चित्र आहे. चाचा या लग्नामुळे अतिशय खूश झालेले दिसत असून फोटोशूट दरम्यान, चांगल्या पोजही देत आहेत.  या व्हिडिओमध्ये चाचांच्या चेहऱ्यावर आंनद दिसत आहे. लग्नातील पाहुणे देखील चाचांचे अभिनंदन करताना दिसतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या लग्नाबद्दल चाचांना जितका आनंदी होता, तितकाच आनंद त्याच्या नवरीलाही झालाय.ती देखील व्हिडीओमध्ये हसतमुख दिसत आहे. फोटोसाठी पोज देतानाही दिसली.

जोडप्याच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोक या नव दाम्पत्याची चेष्टा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय की, आमचा लग्नावरचा विश्वास उडालायय. काहींनी म्हटलंय चाचांचं आयुष्य सेट झालं. काहींनी म्हटलंय की, शेवटच्या प्रयत्नात चाचांना सरकारी नोकरी मिळालीये. वयाच्या 70 व्या वर्षी चाचांनी इच्छा पूर्ण करुन दाखवली, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.@zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'एका रात्रीचे किती घेतेस,...', अभिनेत्री सुरेखा कुडची यांना विचारणा; खळबळजनक खुलासे

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम