Assam Flood Viral Video : आसामला (Assam Flood) मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. आसाममधील 32 जिल्हे महापुरामुळे बाधित झाले आहेत. आसामधील पूरस्थितीचं भीषण वास्तव दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका गोंडस बाळाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. वासूदेवानं श्रीकृष्णाला टोपलीतून डोक्यावरून नेलं त्याप्रमाणे या व्हिडीओमध्ये एक माणूस बाळाला पुराच्या पाण्यातून टोपलीत ठेऊन त्याला पुरातून बाहेर काढताना दिसत आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. आजूबाजूचा संपूर्ण परिसर जलमय झाला असून या पाण्यातून वाट काढत एक व्यक्ती आपल्या नवजात बाळाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी या व्यक्तीने वासुदेवाप्रमाणे चिमुकल्या बाळाला एका टोपलीमध्ये ठेवल्याचं दिसत आहे. त्यानंतर हा व्यक्ती पाण्यातून वाट काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 






 


यावेळी त्या व्यक्तीला इतरही काही लोक मदत करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या नवजात बाळाला पाण्यातून सुखरुप बाहेर काढताना या बाळाचे वडील आणि इतर लोक बाळासोबत खेळतानाही दिसत आहेत. बाळाचे वडील आणि बाजूचे लोक बाळासोबत संवाद साधताना आणि यावर बाळ गोड हसत प्रतिक्रिया देत असल्याचं दिसून येत आहे.


संबंधित इतर बातम्या