Anand Mahindra Thar Video : सगळ्यांच्याच आवडीची गाडी म्हणजे महिंद्रा थार . रस्त्याने फिरताना दिसली की अनेकांच्या नजरा खिळतात. दिसायला रॉयल असलेल्या या थारने लहानग्यांच्या मनातही घर केलं आहे. मात्र याच थारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी तिच्या महिंद्रा थारमधून आपली पाणी पुरीची गाडी ओढताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी थार गाडीने पाणीपुरीची गाडी ओढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामुळे हा व्हिडीओ चंगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मेरठची तापसी आहे. जी तिच्या 'बीटेक पाणी पुरी वाली' स्टार्टअपमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. नुकतीच तिने महिंद्रा थार विकत घेतली. याच थारच्या मदतीने ती पाणीपुरीची गाडी खेचताना दिसत आहे. याआधी तिने स्कूटर आणि बाईकसोबतही हे काम केलं असलं तरी थेट थारने आपली पाणी पुरीची गाडी खेचल्याने ती व्हायरल झाली आहे.
मला हा व्हिडिओ का? आनंद महिंद्रा म्हणतात...
आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स आधीच्या ट्विटरवर लिहिले, "ऑफ-रोड वाहने कशासाठी आहेत? लोकांना अशा ठिकाणी पोहोचण्यास मदत करण्यासाठी आणि लोकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यास मदत करण्यासाठी आहे आणि विशेषत: आम्हाला आमची वाहने लोकांना पुढे जाण्यास आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत करताना दिसत आहे. मला हा व्हिडिओ का? आवडला हे आता तुम्हाला समजले असेलच.
आनंद महिंद्रा हे एक्सवर फार अॅक्टिव्ह असतात. ते नवनवे जुगाड ते त्यांच्या ट्विटरवर शेअर करत असतात. तरुणांनी तयार केलेल्या अनेक गाड्यांचं त्यांनी कौतुक केलं आहे. अनेक तरुणांना ते नवनव्या संकल्पना सुचवण्याचं आवाहन करत असतात. त्यांनी शेअर केलेले हे जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होता. व्हिडीओ शेअर करुन ते अनेक नव्या संशोधकांना किंवा तरुणांना आर्थिक मदतदेखील करत असतात.
थारची किंमत किती?
थार 4x2 ची सुरुवातीची किंमत 10.98 लाख रुपये आहे, जी 13.77 लाख रुपयांपर्यंत जाते. तरीही, हे 4 x 4 कमी आहे. दरम्यान, थार 4×4 च्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 14.04 लाख ते 16.27 लाख रुपये आणि डिझेल व्हर्जनची किंमत 14.60 लाख ते 16.94 लाख रुपये आहे.
इतर महत्वाची बातमी-