Google AI Feature : गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला (google AI) जाणारा ब्राउझर आहे. गुगलने या ब्राउजरसाठी तीन जनरेटिव्ह AI फीचर्स रोलआउट केले आहेत. या तीन फिचर्सची भर पडल्याने गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्सना नवा अनुभव मिळणार आहे. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल एक्सच्या माध्यमातून गुगल क्रोमच्या या 3 AI फिचरची घोषणा केली आहे. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या तीन फीचर्सची माहिती दिली आहे. जाणून घेऊया गुगल क्रोममध्ये येणाऱ्या या तीन जेनेरिक AI फिचर्सबद्दल...


हे युजर्स अॅक्सेस करू शकतील


गुगल क्रोम M121 च्या नव्या व्हर्जनमध्ये हे तीन जेनेरेटिव्ह AI फिचर्स उपलब्ध असतील. हे फिचर सध्या विंडोज पीसी आणि मॅकवर आणण्यात आले आहे. सध्या हे फीचर फक्त अमेरिकेत रोलआउट करण्यात आले आहे. नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर युजर्सला गुगल क्रोमच्या सेटिंग्समध्ये एक्सपेरिमेंटल AI असलेला टॅब मिळेल. युजर्स या टॅबच्या माध्यमातून अॅक्सेस करू शकतील. मात्र, गुगल क्रोमचे हे फfचर सध्या लोकांच्या अनुभवासाठी असल्याने एंटरप्राइझ आणि एज्युकेशनल अकाऊंटमध्ये हे फीचर अॅक्सेस करता येणार नाही.


टॅब मॅनेज करता येणार


गुगल क्रोममधील या जेनेरेटिव्ह AI फिचरमुळे युजर्सला स्मार्टपणे टॅब मॅनेज करण्याचा पर्याय मिळणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी युजर्सला राईट क्लिक केल्यानंतर अशाच टॅबमध्ये जावे लागेल. दिलेल्या ड्रॉप डाऊन मेनूमध्ये युजर्स आपले आवडते टॅब मॅनेज करू शकतील. याशिवाय गुगलमध्ये आणलेले हे जनरेटिव्ह AI फिचर युजर्सना नावे आणि इमोजींची सूचनाही देईल.


 स्वत:ची थीम तयार करू शकाल



गुगल क्रोमसाठी युजर्स स्वत:साठी थीम तयार करू शकतील. हे एआय फिचर टेक्स्ट-टू-इमेज डिफ्यूजन मॉडेलवर काम करतं. हे फिचर वापरण्यासाठी युजर्सला साइड पॅनेलमधील कस्टमाइज क्रोममध्ये जावे लागेल. यानंतर थीम बदलण्यासाठी चेंज थीमवर टॅप करा. यानंतर क्रिएट विथ AI वर टॅप करा आणि तुम्ही तुमची कस्टमाइज्ड थीम तयार करू शकाल.


लिखाणासाठी मदत करणार


गुगल क्रोमसाठी हे कमाल फिचर आहे. गुगल क्रोममध्ये कोणतीही वेबसाईट उघडल्यानंतर युजर्स "Help me write" वर राईट क्लिक करतील, मग AI त्यांना काहीही टाइप करण्यात मदत करू शकेल.






इतर महत्वाची बातमी-


Google Podcasts : गुगल लवकरच बंद करणार आहे 'हे' लोकप्रिय अॅप, तुम्हीही वापरत असाल तर अशा प्रकारे ट्रान्सफर करा डेटा!