African Queen Angola Nzinga Mbandi : इतिहासात राजे, महाराजांसोबत अनेक बहादूर राण्याही होऊन गेल्या, ज्या त्यांच्या शौर्यासाठी ओळखल्या जातात. इतिहासात बहादूर राणी म्हणून अनेकदा आफ्रिकेच्या एका राणीचा उल्लेख केला जातो. आफ्रीकेतील ही राणी उत्तम शासक आणि शौर्यासाठी ओळखली जाते. पण, काही लोक या राणीकडे क्रूर शासक म्हणूनही पाहतात. या राणीबाबत ऐकल्यावरू पुरुषांच्या अंगावर काटा उभा राहिल. ही राणी पुरुषांशी संबंध ठेवल्यानंतर त्यांना क्रूरतेने ठार मारायची. पण, इतिहासकारांच्या मते, 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवादाविरुद्ध युद्ध पुकारणारी ही राणी त्या काळातील सर्वात आवडती राणी होती. या राणीबाबतची रंजक कहाणी जाणून घ्या.
पुरुषांसोबत संबंध ठेवल्यावर त्यांना जिवंत जाळायची 'ही' राणी
सतराव्या शतकात आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवादाच्या विरोधात युद्ध पुकारलेली आफ्रिकन देश अंगोलाची राणी एनजिंगा एमबांदी हिला एक शूर योद्धा म्हणून पाहिलं जातं. पण ती तितकीच क्रूर होती. तिने भावांची हत्या करत सत्ता काबीज केली. एनजिंगा एमबांदी एक साहसी योद्धा होती. या राणीबद्दल असं सांगितलं जातं की, एनजिंगा एमबांदी राणी एकदा पुरुषासोबत संबंध ठेवल्यानंतर त्या पुरुषाला जिवंत जाळून त्याची हत्या करायची.
आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय राणी
काही प्रचलित कहाण्यांमध्ये सांगितलं जातं की, राणी एनजिंगा एमबांदी तिच्या हरममध्ये राहणाऱ्या पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर, त्यांना त्यांना जिवंत जाळायची. असं असली तरी राणी एनजिंगा एमबांदी सर्वात लोकप्रिय राणी होती. इतिहासकारांच्या मते, राणी एनिजिंगा ही त्या काळातील आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय राणी होती. राणी एनजिंगा एमबांदी आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय महिलांपैकी एक होती.
पोर्तुगीज सैन्याविरोधात युद्ध
आफ्रिकेतील एक राणी शूर आणि क्रूर शासक अशा दोन्ही कारणांसाठी ओळखली जाते. सोन्या-चांदीच्या शोधात अंगोलावर पोर्तुगीज सैन्याने हल्ला केला. याला प्रत्युत्तर देत एनजिंगा एमबांदीने त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं. राणी एनजिंगाने सुरुवातीला युरोपीय लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने अंगोलावर आक्रमण करणाऱ्या युरोपीय वसाहतवाल्यांशी शौर्याने लढा दिला होता.
कशी बनली राणी?
एनजिंगा एमबांदी तिचे वडील राजा किलुंजी एमबांदी यांच्यासोबत राजकारभार आणि संघर्षामध्ये सहभागी असायची. 1617 मध्ये राजा किलुंजी एमबांदीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा एनगोला एमबांदी याच्या हाती सत्ता गेली. पण त्याच्याकडे वडीलांप्रमाणे शौर्य आणि बुद्धिमत्ता नव्हती, जी त्याची बहीण एनजिंगाकडे होती. एनगोला एमबांदीला भीती वाटू लागली की, त्याचेच लोक एनजिंगाच्या वतीने आपल्याविरुद्ध कट रचत आहेत. या भीतीपोटी एनगोला एमबांदीने एनजिंगाच्या मुलाला फाशीची शिक्षा दिली.
सत्तेसाठी तिच्या भावाची हत्या
दरम्यान, जेव्हा नवीन राजा एनगोला एमबांदी युरोपियन आक्रमणकर्त्यांना तोंड देऊ शकला नाही. युरोपीय आक्रमणकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असताना त्याने एका जवळच्या सहकाऱ्याचा सल्ला स्वीकारला आणि आपल्या बहिणीसोबत सत्ता वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एनजिंगाची युरोपसोबत चर्चेला सुरुवात झाली. एनजिंगा खूप प्रभावशाली रणनीतिकार होती. 1624 मध्ये एनजिंगाचा भाऊ एका छोट्या बेटावर गेला होता. कालांतराने त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. काही लोकांच्या मते. राणी एनजिंगाने तिच्या मुलाच्या मृत्यूचा बदला आणि सत्तेसाठी तिच्या भावाची हत्या केली.