एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2020 | मंगळवार
1. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर, 10 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी, 12 ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांसाठी कोविड टेस्ट अनिवार्य https://bit.ly/3fr62Vg
2. अडीच-तीन महिने पगार नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर, थकीत वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर https://bit.ly/2PmKWfV
3. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा अंतिम निकाल जाहीर, प्रदीप सिंह टॉपर, देशात 15 व्या रँकवर असलेली नेहा भोसले राज्यात पहिली https://bit.ly/2DuKvh8
4. मुंबईला पावसाने झोडपलं; कांदिवलीत दरड कोसळली, रुळांवर पाणी साचल्याने अत्यावश्यक सेवेसाठीची रेल्वे सेवा ठप्प, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर बंद https://bit.ly/3i9ocN4
5. मुंबईसोबतच कोकण किनारपट्टीवरही पावसाचं तांडव, सावित्री, कुंडलिका या नद्या दुथडी भरून तर जगबुडी धोक्याच्या पातळीवर https://bit.ly/30r7S3Z
6. राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज, घराघरात दिवाळीसारखं वातावरण https://bit.ly/2BWg5DU
7. राम मंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात भाजपचं शक्तिप्रदर्शन, श्रीरामपूजन, मिठाई वाटप, दीपोत्सव, रांगोळ्या अशा कार्यक्रमांचं आयोजन https://bit.ly/33wlyMW
8. 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार आली नव्हती, सुशांतच्या वडिलांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण https://bit.ly/31iPUjy
9. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर खून, भाजप नेते नारायण राणे यांचा आरोप, कुणाला तरी वाचवण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत असल्याचा दावा https://bit.ly/3kb9abi
10. ‘गुंजन सक्सेना द कारगील गर्ल’ सिनेमाच्या क्रेडिट रोलमधून करण जोहरला तूर्तास डच्चू, नेपोटिझमवरुन उफाळलेल्या वादाचा फटका! https://bit.ly/33peYbd
BLOG - | योद्ध्यांवर हल्ले! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2D8LzHH
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR