Awards 2022 : मनोरंजनाच्या वारीत वर्षभर कंबर कसून प्रेक्षकांच्या सेवेत त्यांची करमणूक करण्यासाठी अनेक कलाकार सज्ज असतात. मग ते पडद्यामागील असो वा पडद्यावर दिसणारे. या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी कलर्स मराठी आणि झी मराठीने खास पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. आज हे पुरस्कार सोहळे रंगणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

Continues below advertisement


मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. कोरोनाकाळातदेखील मालिकांनी प्रेक्षकांसोबतचं नातं अबाधित राखलं. आता कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील,  महाराष्ट्राची लाडकी सून कोण ठरणार ? कोण ठरणार लोकप्रिय नायक - नायिका ? कोण ठरले लोकप्रिय कुटुंब, कोणती जोडी ठरली लोकप्रिय जोडी ? कोणत्या मालिकेने पटकावले लोकप्रिय मालिकेचे अवॉर्ड? या सगळ्याच विभागांच्या स्पर्धेत चांगलीच चुरस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


दिमाखदार पुरस्कार सोहळे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तसेच प्रेक्षकांना एक खास सरप्राईझदेखील मिळणार आहे.  यंदाचा झी गौरव हा विशेष आहे. कारण या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.





आपल्या आडत्या व्यक्तिरेखेला, आवडत्या नायकाला, आणि लाडक्या नायिकेला अवॉर्ड मिळणार की नाही याची वाट सगळेच प्रेक्षक बघत होते. अखेर सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे. लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी सामर्थ' ठरली आहे. तर लोकप्रिय नायकचा पुरस्कार 'स्वामी समर्थ' ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या अक्षय मुडावादकरला मिळाला आहे. अक्षया नाईक म्हणजेच 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील लतिका लोकप्रिय नायिका ठरली आहे. लोकप्रिय खलनायक 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतला दौलत तर खलनायिका 'जीव माझा गुंतला' मालिकेतील चित्राला मिळाला. लोकप्रिय कुटुंब ठरले चोळप्पा कुटुंब – जय जय स्वामी समर्थ. तर कथाबाह्य कार्यक्रम बिग बॉस मराठी 3' ठरला आहे.  


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...


Shah Rukh Khan : ‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया...’


Happy Birthday Ram Charan : अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha