Ram Charan Birthday : ‘मगधीरा’, ‘येवडू’, ‘रंगस्थलम’, ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला दाक्षिणात्य अभिनेता रामचरण (Ram Charan) आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहेत. रामचरण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी याचा मुलगा आहे. राम चरण याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला. 'चिरुथा' या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रामचरण याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी 2007मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

   


चित्रपट अभिनेता असण्यासोबतच रामचरण एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरणची एकूण संपत्ती 1,250 कोटी रुपये आहे. राम चरण हा ट्रूजेट एअरलाइनचा संचालक आहे. 2013 मध्ये त्याने याची सुरुवात केली होती.


अभिनयासोबतच गाण्याचा छंद


राम चरण याला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड आहे. 'तूफान' या तमिळ चित्रपटासाठी त्याने एक गाणेही गायले आहे. याशिवाय त्यांनी दोन तमिळ चित्रपटांची निर्मितीही केली आहे. अभिनेत्याने साऊथसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्येही हात आजमावला, पण तो यशस्वी झाला नाही. राम चरणने प्रियांका चोप्रासोबत 'जंजीर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. मात्र, नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


व्यवसायिकाच्या लेकीशी बांधली लग्नगाठ!


राम चरणने जून 2012मध्ये अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप रेड्डी यांची नात उपासना कामिनेनीशी लग्न केले. उपासना स्वतः अपोलो चॅरिटीच्या उपाध्यक्षा आणि बी पॉझिटिव्ह मासिकाच्या मुख्य संपादक आहेत.


अभिनेत्याच्या बंगला आणि गाड्यांचीही चर्चा!


रामचरण यांचा ज्युबली हिल्स हैदराबाद येथे बंगला आहे. त्याची किंमत सुमारे 38 कोटी असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी रामचरणच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे, तर त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोव्हर ते ऑडी यांसारख्या लक्झरी कार आहेत.


रामचरण याच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज कार आहे, जिची किंमत तब्बल 1.32 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे असणाऱ्या मर्सिडीज बेंझ एस सीरीज कारची किंमत 2.73 कोटी रुपये आहे. रामचरणच्या रेंज रोव्हर वोगची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.   


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha