ठाणे : सहसा आपल्या सायकल किंवा गाडीच्या वाहनाचे पंक्चर काढायचे असल्यास आपण पंक्चर काढणाऱ्या कारागिराजवळ उभे राहून पाहणी करत असतो. मात्र, कधी कधी पंक्चर काढणे व ते पाहणे धोकादायक ठरू शकते, हेच लक्षात भिवंडीतील घटनेवरुन लक्षात येईल. भिवंडी तालुक्यातील मानकोली परीसरात इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानांमध्ये हवा भरत असताना टायरमध्ये अति जास्त प्रमाणात हवा भरल्याने टायर अचानक  फुटून हवेत उडाल्याची घटना घडली. सुरेंद्र कुमार यादव (वय 45) वर्षे याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आपण खबरदारी घेतली पाहिजे, हेच लक्षात येईल.  


जखमी सुरेंद्र यादव हा पंक्चर बनवण्यासाठी मानकोली येथील समीम पंक्चरवाला याच्याकडे गेला व समीम अली याने पंचर बनवून टायरमध्ये हवा भरली होती, परंतु जखमी सुरेंद्र यादव यांनी या टायरमध्ये अजून हवा भरण्यास सांगितले. त्यावेळी, समीम अलीने सांगितले की, या टायरमध्ये हवा पुरेशी आहे. तेव्हा पंक्चर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांनी स्वतः टायरमध्ये हवा भरण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे टायरमध्ये प्रमाणापेक्षा अति जास्त हवा भरली गेल्याने टायर अचानक फुटून उडाल्याने पंक्चर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं असून तेथून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या संदर्भात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे, पंक्चर काढताना टायरपासून दूरच आपण उभे राहायला हवं. तसेच, या सावधान राहून काळजी घ्यावी.



हेही वाचा


Amol Mitkari : नितेश राणेंना नेपाळला पाठवायला जनता उत्सुक; हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरुन मिटकरींचा पलटवार