Ambarath News: अंबरनाथमधील (Ambarnath) तब्बल सव्वा कोटी बोकडाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या बोकडाला विकून मदरसा बांधण्याची मालकाची इच्छा होती. या बोकडाच्या अंगवार अल्लाह आणि मोहम्मद असे दोन शब्द लिहीण्यात आले होते. त्यामुळेच या बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये ठेवली होती. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून त्याचं गावामध्ये शाळा बांधण्याचं स्वप्न होतं. परंतु बकरी ईद पूर्वीच या बोकडाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बोकडाचे नाव शेरु असं होतं. बकरी ईदच्या दिवशी या बोकडाची विक्री केली जाणार होती. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ परिसरातील जुना भेंडी पाड्यात राहणाऱ्या शकील शेख यांच्या मालकीचे हे बोकड होते. या बोकडाच्या अंगावर नैसर्गिकरित्या असलेल्या काळ्या आणि पंढऱ्या रंगात उर्दूमध्ये अल्लाह आणि मोहम्मद असे शब्द होते. या बोकडाचे वजन तब्बल 100 किलो होते. तर त्याला केवळ दोनच दात होते. शकील हे शेरुचे आपल्या घरातील एका सदस्याप्रमाणे पालन आणि पोषण करत होते. परंतु मागील काही दिवसांपासून शेरु हा सतत आजारी असायचा. त्याच्या उपचारांसाठी दररोज दोन हजार रुपये खर्च येत असे. जो शकील हे करत देखील होते. मात्र उपचारादरम्यान त्या बोकडाचा मृत्यू झाला.