Thane Shahapur Rain Latest News :  मुंबईसह (Mumbai) उपनगरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे शहर (Thane city) आणि जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठाण्यातील शहापूर (Thane shahapur) तालुक्यात मुसळधार पावसामुळे नादिनाल्याला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहून गेलेल्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. इतर दोघांचा शोध घोण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.. सर्च ऑपरेशन सुरु आहे. बेपत्ता असलेल्या दोन जणांमध्ये एका महीलेचा देखील समावेश आहे. भगवान भगत (रा.कोठारे), बाभळी वाघ (रा. शिलोत्तर), तुकाराम मुकणे  (रा. टेंभरे) आणि विमल सराई (रा. पिवळी खोर) असे ओढ्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. यामधील दोन जणांचा मृत्यू झालाय.  


गेल्या पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. या पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पूराच्या पाण्यात चार जण वाहून गेले आहेत. यापैकी दोन जण बेपत्ता आहेत. नदी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शोध मोहीम सुरू आहे.  


बेपत्ता झालेल्या चार पैकी एक महिला बाजारात समान खरेदी करून घरी जाताना रस्त्यावर पाणी वाहत होते. त्यामुळे ती पाण्यातून वाट काढत घरी जाताना ती वाहून गेली. तर तीन शेतकरी शेतातून घरी येताना रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहमध्ये वाहून गेले. चार पैकी दोघांचे मृतदेह नदी पत्रातून काढण्यात बचवपथकाला यश आले आहे. मात्र दोघे अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.