Water Cut in Thane : ठाणेकरांसाठी (Thane News) मोठी बातमी असून बुधवारी (28 ऑगस्ट) ते गुरुवारी (29 ऑगस्ट) तब्बल 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. या काळत पाणी जपून वापरण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) करण्यात आलं आहे. या वेळेत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वा. ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यंत असा 24 तासांचा शटडाऊन घेवून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे महत्वाचे कामाकरता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
कोणकोणत्या भागात राहणार पाणीपुरवठा बंद?
परिणामी घोडबंदर रोड, पवारनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राममंदिर रोड, मानपाडा, टिकूजीनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वीनगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेतीबंदर इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बुधवारी 28 ऑगस्ट सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरूनगर, किसननगर-2, इटनिर्टी, जॉन्सन, जेल, साकेत इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवार रात्री 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहील, अशा रितीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
सदर शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
Mumbai Rains: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 7 तलावांमध्ये 200 दिवस पुरेल इतकं पाणी जमलं, 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता