Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजण खळगे धबधब्यावर साडेबाराच्या सुमारास आंघोळीचा आनंद घेत असताना 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सॅम राज दुराई असं या मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होता. तो आपल्या पाच मित्रांसह माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी ही घटना घडली.
दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश
या घटनेची माहिती मिळताच NDRF टीम आणि जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाने या धबधबा परिसरात पर्यटनासाठी बंदी घातलेली असूनही पर्यटकांचा वावर सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वीही जवळपास 60 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. तरीदेखील नागरिक जीवनाच्या धोक्याची पर्वा न करता येथे गर्दी करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
राज्यात पर्यटनाच्या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ
राज्यात सातत्यानं पर्यकांचा अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. पर्यटनाला जाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. धोक्याची ठिकाणी जपून गेलं पाहिजे, पण अशा ठिकाणांवर काही पर्यटक हुल्लडबाजी करताना देखील दिसतात. त्यामुळं अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन देखील पर्यटक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत नाहीत, त्यावेळी अशी घटना होतात. गेल्या काही दिवसापूर्वीच पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दु्र्घटना ताजी असताना देखील पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी योग्य ती खबदारी घेतना दिसत नाहीत. पुण्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या ब्रीजवर एकाचवेळी अनेक पर्यटक आल्या पूल तुटल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पर्यटकांनी पर्यटनाच्या ठिकाणी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत