Thane News : आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा उत्सव म्हणजेच गणोशोत्सव (Ganeshotsav). गणेशोत्सवाला अद्याप तीन महिने जरी बाकी असले तरी मूर्तिकार मात्र फार आधीपासूनच तयारीला लागतात. भारताबरोबरच परदेशातही गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठीच परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरूण उद्योजकाने तब्बल 80 हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवले आहेत. 


बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा परदेशवारीचा हा प्रवास फार लांबचा असतो. याच कारणाने अगदी सहा महिने आधीपासूनच गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठवले जातात. मार्च ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते. यामध्ये हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात. यंदा निमेश जनवाड यांच्या माध्यमातून 80 हजार बाप्पा परदेशवारीला रवाना झाले आहेत.     


कधी आहे गणेश चतुर्थी? 


भारतासह देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहात असतात. त्यानुसार, यंदाही गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. यंदा 7 सपटेंबर रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार